शाळकरी विद्यार्थ्यांचा डोहात बुडून करूण अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 10:12 PM2018-09-18T22:12:32+5:302018-09-18T22:17:27+5:30

दोन शाळकरी विद्यार्थी पोहता पोहता डोहात शिरले आणि तिथे त्यांचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वग-वीरखंडीदरम्यान वाहणाऱ्या आमनदीच्या पात्रात मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे वग येथे शोककळा पसरली.

Schooly students drown in the pool and death | शाळकरी विद्यार्थ्यांचा डोहात बुडून करूण अंत

शाळकरी विद्यार्थ्यांचा डोहात बुडून करूण अंत

Next
ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील वग शिवारातील घटना : पोहण्यासाठी उतरले नदीत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन शाळकरी विद्यार्थी पोहता पोहता डोहात शिरले आणि तिथे त्यांचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वग-वीरखंडीदरम्यान वाहणाऱ्या आमनदीच्या पात्रात मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे वग येथे शोककळा पसरली.
सुजल रामकृष्ण डहाके (१४) व दिशांत किशोर शास्त्रकार (१४) दोघेही रा. वग, ता. कुही अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. दोघेही वग येथील बालाजी पाटील हायस्कूलमध्ये इयत्ता आठव्या वर्गात शिकायचे, शिवाय ते मित्रही होते. मंगळवारी त्यांची सकाळची शाळा होती. त्यामुळे दोघेही त्यांच्या मित्रांसोबत दिवसभर खेळले आणि सायंकाळी सायकलने आम नदीवर पोहण्यासाठी गेले. विशेष म्हणजे, दोघांनाही पोहता येत होते. दरम्यान, ते डोहात शिरले आणि खोल पाण्यात जाताच गटांगळ्या खाऊ लागले. त्यातच दोघांचा बुडून मृत्यू झाला.
त्यांनी त्यांची सायकल नदीच्या काठावर उभी ठेवली व सायकलवर कपडे ठेवले होते. त्याकडे शिवारातील शेतकºयाचे लक्ष गेले. त्याला शंका आल्याने त्याने मुलांचा शोध घेतला. ते कुठेही न गवसल्याने त्याने इतरांना बोलावून डोहात शोध घेतला असता त्यांना सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास सुजलचा मृतदेह गवसला. या प्रकाराची माहिती मिळताच दोघांचेही कुटुंबीय व ग्रामस्थ नदीजवळ पोहोचले. स्थानिक तरुणांनी लगेच डोहात उतरून दिशांतचा शोध घेतला असता, रात्री ७.३० वाजताच्या सुमारास त्याचाही मृतदेह गवसला. त्यानंतर कुही पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोघांचेही मृतदेह कुही येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. याप्रकरणी कुही पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला.

कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
सुजल हा आईवडिलांना एकुलता एक होता. शिवाय, त्याचे वडील ‘टेलरिंग’चा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्याला एक बहीण आहे. दिशांत हा मूळचा धुरखेडा (ता. उमरेड) येथील रहिवासी असून, त्याचे वडील फोटो फ्रेमिंगचा व्यवसाय करून संसाराचा गाडा ओढतात. तो लहानपणापासून वग येथे मामाकडे राहायचा. तो पहिल्या वर्गापासून वग येथेच शिकला. त्याच्या मामाचे आठवडाभरापूर्वी आजाराने निधन झाले तर, महिनाभरापूर्वी आजोबांचा आजाराने मृत्यू झाला. त्यातच दिशांतही गेला. या घटनेमुळे डहाके व शास्त्रकार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

Web Title: Schooly students drown in the pool and death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.