नागपुरात चोरी करणाऱ्या युवतीला चोप : घटनेचा व्हिडीओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 11:23 PM2018-11-22T23:23:31+5:302018-11-22T23:26:40+5:30

दुकानाच्या काऊंटरवरील कपडे चोरणाऱ्या एका युवतीला दुकानदार आणि त्याच्या साथीदारांनी बेदम चोप दिला. चोरट्या युवतीचा चेहरा सार्वजनिक करण्याठी तिचे केस मागे खेचून तिला शिवीगाळ करण्यात आली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Scolding the girl for theft in Nagpur: The video of the incident viral | नागपुरात चोरी करणाऱ्या युवतीला चोप : घटनेचा व्हिडीओ व्हायरल

नागपुरात चोरी करणाऱ्या युवतीला चोप : घटनेचा व्हिडीओ व्हायरल

googlenewsNext
ठळक मुद्देसर्वत्र खळबळ, पोलिसांची धावपळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुकानाच्या काऊंटरवरील कपडे चोरणाऱ्या एका युवतीला दुकानदार आणि त्याच्या साथीदारांनी बेदम चोप दिला. चोरट्या युवतीचा चेहरा सार्वजनिक करण्याठी तिचे केस मागे खेचून तिला शिवीगाळ करण्यात आली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
जरीपटक्यातील चौधरी चौकाजवळच्या एका कपड्याच्या दुकानात ही युवती शिरली. तिने अनेक ग्राहकांच्या उपस्थितीत लॅगिन आणि अन्य काही कपडे आपल्या टी-शर्टमध्ये कोंबले. तिची नजर काही वेळाने दुकानात लागलेल्या सीसीटीव्हीवर जाताच तिने ते कपडे लगबगीने टी-शर्टमधून काढून दुकानाच्या काऊंटरवर ठेवले. दरम्यान, हा प्रकार दुकानदारासह एका महिला ग्राहकाच्या लक्षात आल्यानंतर दुकानदाराने तिला दुकानातून हाकलून लावले. काही वेळेनंतर ही तरुणी बाजूच्या दुसऱ्या एका कपड्याच्या दुकानात शिरली. तिच्या मागावर असलेला दुकानदार तिचा पाठलाग करीत त्या दुकानात पोहचला आणि त्याने त्या दुकानदाराला ही युवती चोरटी आहे, असे सांगितले. त्यानंतर दुकानदार आणि त्याच्या साथीदाराने युवतीला चोप देणे सुरू केले. तिने एकदा चोरी केल्याची कबुली देत मारू नका, मी कपडे आणून देते, अशी विनवणी केली. मात्र, दुकानदार आणि साथीदारांनी तिला बेदम मारहाण करतानाच तिचा व्हिडीओ तयार केला. व्हिडीओत तिचा चेहरा स्पष्ट दिसावा म्हणून आरोपी दुकानदारांनी तिचे केस मागे खेचले. त्यानंतर प्रकरण कसेबसे निस्तरले. दरम्यान, युवतीला चोप देतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ निर्माण झाली. त्यानंतर दोन्हीकडून पोलिसांत धाव घेण्यात आली. मात्र, प्रकरण दोघांच्याही अंगलट येण्याचे संकेत मिळाल्याने कुणीही तक्रार करण्याची हिंमत दाखवली नाही. परिणामी २४ तासांपेक्षा जास्त अवधी होऊनही या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नव्हता.

 

 

Web Title: Scolding the girl for theft in Nagpur: The video of the incident viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.