५०० उठबशा काढायला लावणाऱ्या मुख्याध्यापिकेचे वेतन रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 22:43 IST2017-12-14T22:41:44+5:302017-12-14T22:43:12+5:30
गृहपाठ केला नाही म्हणून कोल्हापुरात एका विद्यार्थिनीला ५०० उठबशांची शिक्षा देण्याचा धक्कादायक प्रकार घडला. हा मुद्दा गुरुवारी विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला. अमरनाथ राजूरकर यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे यासंदर्भात कारवाई काय होणार, असा प्रश्न उपस्थित केला. यावर या मुख्याध्यापिकेचे वेतन थांबविण्यात आले असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.

५०० उठबशा काढायला लावणाऱ्या मुख्याध्यापिकेचे वेतन रोखले
ऑनलाईन लोकमत
नागपूर : गृहपाठ केला नाही म्हणून कोल्हापुरात एका विद्यार्थिनीला ५०० उठबशांची शिक्षा देण्याचा धक्कादायक प्रकार घडला. हा मुद्दा गुरुवारी विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला. अमरनाथ राजूरकर यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे यासंदर्भात कारवाई काय होणार, असा प्रश्न उपस्थित केला. यावर या मुख्याध्यापिकेचे वेतन थांबविण्यात आले असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले असून, वेळ पडली तर गुन्हेगारी प्रकरण दाखल करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
चंदगड तालुक्यातील कानूर बुद्रुक गावातील भावेश्वरी शाळेत शिकणाऱ्या आठवीतील विद्यार्थिनीने गृहपाठ केला नव्हता. या कारणासाठी शाळेच्या मुख्याध्यापिकेने तिला ५०० उठबशा काढण्याची शिक्षा दिली. ३०० उठबशा काढल्यावर मुलगी कोसळली. तिला तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.