नागपुरात स्कॉर्पिओच्या धडकेत महिला ठार,मुलगा गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 23:43 IST2019-11-08T23:42:50+5:302019-11-08T23:43:46+5:30
स्कॉर्पिओच्या धडकेमुळे दुचाकीवरील एका महिलेचा मृत्यू झाला तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला. शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास महालमधील सीपी अॅण्ड बेरॉर कॉलेजजवळ हा भीषण अपघात घडला.

नागपुरात स्कॉर्पिओच्या धडकेत महिला ठार,मुलगा गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्कॉर्पिओच्या धडकेमुळे दुचाकीवरील एका महिलेचा मृत्यू झाला तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला. शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास महालमधील सीपी अॅण्ड बेरॉर कॉलेजजवळ हा भीषण अपघात घडला. यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
पोलिसांच्या माहितीनुसार, महिला तिच्या मुलासह दुचाकीवर जात होती. महालमधून रेशिमबागकडे वेगात जाणा-या एका स्कॉर्पिओच्या चालकाने दुचाकीला जोरदार धडक मारली. त्यामुळे दुचाकीवरील मायलेक गंभीर जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी मोठा तणाव निर्माण झाला. जखमी मायलेकांना डॉक्टरकडे नेले असता डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले. या अपघाताच्या संबंधाने उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. मृत आणि जखमीचे नाव मात्र पोलिसांकडून रात्रीपर्यंत स्पष्ट करण्यात आले नव्हते. कोतवाली पोलीस या संबंधाने प्रतिसाद देत नव्हते तर पोलीस उपायुक्तांसह वरिष्ठ अधिका-यांकडेही रात्री ११ वाजेपर्यंत या संबंधाने सविस्तर माहिती आली नव्हती.