भंगार बसचा मनपावर कोट्यवधीचा भार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:24 AM2020-12-13T04:24:55+5:302020-12-13T04:24:55+5:30

भंगार बसचा मनपावर कोट्यवधीचा भार ! () भंगार विक्रीतून अपेक्षित रकमेच्या तुलनेत जागेचे भाडे अधिक : २३० बसचा लिलाव ...

Scrap bus loads crores on Manpa! | भंगार बसचा मनपावर कोट्यवधीचा भार !

भंगार बसचा मनपावर कोट्यवधीचा भार !

Next

भंगार बसचा मनपावर कोट्यवधीचा भार ! () भंगार विक्रीतून अपेक्षित रकमेच्या तुलनेत जागेचे भाडे अधिक : २३० बसचा लिलाव रखडला : भंंगार समितीच्या अहवालही भंगारात

गणेश हूड

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. निधीअभावी विकास कामांना ब्रेक लागले आहे. कर्मचाऱ्यांना हक्काचा अरिअर्स देण्यासाठी पैसे नाही. दुसरीकडे हिंगणा व टेका नाका येथील डेपो मध्ये उभ्या असलेल्या २३० भंगार बसच्या लिलावाकडे दुर्लक्ष केल्याने टेका नाका येथे उभ्या असलेल्या १०९ बसच्या जागेच्या भाड्यापोटी मनपाला दर महिन्याला ५ लाख ५० हजार रुपये द्यावे लागत आहे. वर्षाकाठी ही रक्कम ६६ लाख होत असून मागील पाच वर्षाचा विचार केल्यास ही रक्कम ३ कोटी ३६ लाख होते. म्हणजे भंगार बसच्या लिलावातून अपेक्षित असलेल्या रकमेपेक्षा ही रक्कम कितीतरी मोठी आहे. याला जबाबादार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.

उपराजधानीतील नागरिकांना उत्तम दर्जाची शहर बस सेवा मिळावी. यासाठी मनपाने बस सेवा आपल्या ताब्यात घेतल्यानंतर २००७ मध्ये वंश निमय इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेड (व्हीएनआयएल) ला शहर बसचे कंत्राट देण्यात आले होते. तसेच केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत मनपाला मिळालेल्या २४० बसची जबाबदारी व्हीएनआयएलकडे सोपविण्यात आली. परंतु देखभाल न केल्याने काही वर्षात २३० बस भंगार झाल्या. त्या काही वर्षापासून हिंगणा व टेकानाका येथील डेपोत उभ्या आहेत. टेका नाका येथील डेपो खासगी जागेत असल्याने मनपाला दर महिन्याला ५.५० लाख रुपये भाडे द्यावे लागत आहे. याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Scrap bus loads crores on Manpa!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.