भंगार बसचा मनपावर कोट्यवधीचा भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:24 AM2020-12-13T04:24:57+5:302020-12-13T04:24:57+5:30
भंगारात २३० भंगार बसची विल्हेवाट लावण्यासाठी लिलाव करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला होता. या प्रक्रियेला गती देण्यासाठी २०१८ मध्ये ...
भंगारात २३० भंगार बसची विल्हेवाट लावण्यासाठी लिलाव करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला होता. या प्रक्रियेला गती देण्यासाठी २०१८ मध्ये परिवहन समितीचे तत्कालीन सदस्य प्रवीण भिसीकर यांच्या अध्यक्षतेखाली १३ सदस्यीय समिती गठित करण्यात आली. या समितीने अभ्यास करून अहवाल सादर केला. परंतु तो भंगारात पडून आहे.
...
इंजिन, टायर गायब
हिंगणा व टेका नाका येथे उभ्या असलेल्या अनेक भंगार बसचे इंजिन, टायर व स्पेअर पार्ट चोरीला जात आहे. डेपो परिसरात गवत व झुडपे वाढलेली आहेत. बसचे मूल्य दिवसेंदिवस कमी होत आहे. परंतु मनपाच्या परिवहन विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे.
...
आरसी बुक मनपाकडे नाही
भंगारातील २०० हून अधिक बसचे आरसी बुक मनपाच्या परिवहन विभागाकडे नाही. मे. वंश निमय यांच्याकडून ते प्राप्त झाले नसल्याची माहिती परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. तसेच गेल्या पाच वर्षात प्रादेशिक परिवहन विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळविण्यात विभागाला यश आलेले नाही.
.......
परिवहन समिती नावापुरतीच
शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाची बससेवा उपलब्ध करण्याची जबाबदारी मनपाचा परिवहन विभाग व समितीची आहे. परंतु भंगार बस गाड्याचे स्पेअर पार्ट, इंजिन, टायर चोरीला जात असताना कोणतीही दखल घेतली नाही. समिती जुनेच आदेश नव्याने काढण्यात धन्यता मानत आहे. दुसरीकडे भंगार बसचा लिलाव करण्यासंदर्भात समितीचे सभापती बाल्या बोरकर यांचीच भूमिका उदासीन असून, समिती नावापुरती असल्याचा आरोप नगरसेवक नितीन साठवणे यांनी केला आहे.