स्क्रब टायफसने घेतला बाळंतणीचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 11:10 PM2018-08-27T23:10:20+5:302018-08-27T23:13:30+5:30

‘स्क्रब टायफस’वर नियंत्रण मिळविण्यासाठी सोमवारी आरोग्य विभागाने तातडीची बैठक बोलवून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, मात्र त्याच दिवशी मेडिकलच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या बाळांतणीचा मृत्यू झाला. या मृत्यूने खळबळ उडाली आहे.

Scrub typhus taken life of pregnant woman | स्क्रब टायफसने घेतला बाळंतणीचा जीव

स्क्रब टायफसने घेतला बाळंतणीचा जीव

Next
ठळक मुद्देमेडिकल : मृत्यूची संख्या झाली ६

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘स्क्रब टायफस’वर नियंत्रण मिळविण्यासाठी सोमवारी आरोग्य विभागाने तातडीची बैठक बोलवून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, मात्र त्याच दिवशी मेडिकलच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या बाळांतणीचा मृत्यू झाला. या मृत्यूने खळबळ उडाली आहे.
‘स्क्रब टायफस’ आजाराचे नागपूर जिल्ह्यात रुग्ण दिसून येऊ लागल्याने व मृतांचा आकडा वाढत असल्याने वैद्यकीय क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे. मेडिकलमध्ये गेल्या २६ दिवसांमध्ये १३ रुग्णांची नोंद झाली आहे. मृतांमध्ये तिर्थकुमार धनवानी (५८) रा. जरीपटका, नागपूर , कुसूम खराडे (५४) रा. पारडसिंगा, काटोल, त्रिवेनी गौतम (१७) रा.बालाघाट, मध्यप्रदेश, संजय रणदिवे (३८) रा. महाल, नागपूर व गंगाबाई इरपाचे (५५) रा. नगरखेड आदींचा समावेश आहे. सोमवारी मृत्यू झालेल्या बाळंतणीची माहिती वरीष्ठ डॉक्टरांकडे उपलब्ध नव्हती. परंतु आरोग्य विभागाने घेतलेल्या या बैठकीत या मृत्यूची माहिती देण्यात आल्याचे समजते.
सुत्रानूसार, मृत महिलेने काही दिवसांपूर्वीच एका बाळाला जन्म दिला होता. त्यानंतर तिला ‘स्क्रब टायफस’ रोग झाला. खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर महिलेला अत्यंत गंभीर अवस्थेत मेडिकलमध्ये दाखल केले. अतिदक्षता विभागात उपचार घेत असताना सोमवारी तिचा मृत्यू झाला. सध्या मेडिकलमध्ये नरखेड, अमरावती, कोंढाळी, डोंगरगाव, कामठी, मध्यप्रदेशातील बैतुल व सिवनी येथील रुग्ण उपचार घेत आहेत. यातील दोन रुग्णांची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते.

Web Title: Scrub typhus taken life of pregnant woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.