धुळ्याहून एसडीआरएफची तुकडी नागपुरात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 12:19 AM2018-07-08T00:19:11+5:302018-07-08T00:23:59+5:30

मुसळधार पावसामुळे शुक्रवारी शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. पुरात वा साचलेल्या पाण्यात अडकलेल्या ७०० हून अधिक नागरिकांना एसडीआरएफ व अग्निशमन विभागाच्या जवानांनी सुरक्षितपणे बाहेर काढले. परंतु हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने पुन्हा अशीच परिस्थिती उद्भवल्यास संकटाचा सामना करण्यासाठी धुळे येथून एसडीआरएफची अतिरिक्त तुकडी बोलावण्यात आली आहे. यात ३४ जवानांचा समावेश आहे.

SDRF squad reached from Dhule | धुळ्याहून एसडीआरएफची तुकडी नागपुरात दाखल

धुळ्याहून एसडीआरएफची तुकडी नागपुरात दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देआपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासनाची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुसळधार पावसामुळे शुक्रवारी शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. पुरात वा साचलेल्या पाण्यात अडकलेल्या ७०० हून अधिक नागरिकांना एसडीआरएफ व अग्निशमन विभागाच्या जवानांनी सुरक्षितपणे बाहेर काढले. परंतु हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने पुन्हा अशीच परिस्थिती उद्भवल्यास संकटाचा सामना करण्यासाठी धुळे येथून एसडीआरएफची अतिरिक्त तुकडी बोलावण्यात आली आहे. यात ३४ जवानांचा समावेश आहे. बोट व मदतसाहित्यासह ही तुकडी शनिवारी नागपुरात दाखल झाली आहे.
नागपुरात एसडीआरएफच्या दलात १२८ जवान आहेत. त्यांच्या मदतीला धुळे येथून पुन्हा ३४ जवान आले आहेत. आपत्तीच्या काळात जिल्हा आपत्ती निवारण कक्षाच्या माध्यमातून मदत व बचाव कार्य राबविले जाते. यासाठी महापालिकेचा अग्निशमन विभाग, एनडीआरएफ विभागाची मदत घेतली जाते. एसडीआरएफचे हिंगणा येथे कॅ म्प आहे. येथील जवानांच्या मदतीला पुन्हा तुकडी बोलावण्यात आली आहे.

चार केंद्रात चार बोटी
शुक्र वारी अग्निशमन विभागाच्या बचाव पथकाला बोटीसह घटनास्थळी पोहचताना अडचणी आल्या. याचा विचार करता सुगतनगर, नरेंद्रनगर, सक्करदरा व सिव्हील लाईन येथील केंद्रात बोटी तैनात ठेवण्यात आल्या आहेत. तसेच साचलेले पाणी काढण्यासाठी पंप सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती अग्निशमन विभागाचे प्रमुख राजेंद्र उचके यांनी दिली.
एनएसएसचे विद्यार्थी सज्ज
आपत्ती काळात मदतीसाठी अग्निशमन विभागाच्या जवानांसोबतच संकटग्रस्तांच्या मदतीला धावून येण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस)च्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. ४० विद्यार्थ्यांनी विभागाकडे नोंदणी केली आहे. तसेच मेजर जकाते महाविद्यालय व प्रहारच्या १२ जणांनी नोंदणी केली आहे.

Web Title: SDRF squad reached from Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.