नागपुरातील भालदारपुरा परिसर सील : मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 10:48 PM2020-04-22T22:48:38+5:302020-04-22T22:50:38+5:30

नागपूर महानगरपालिका हद्दीतील गांधीबाग-महाल झोनअंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र. १९ मधील भालदारपुरा परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात होऊ नये म्हणून नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता हा परिसर सील करण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी दिले आहेत.

Seal of Bhaldarpura area in Nagpur: Order of Municipal Commissioner Tukaram Mundhe | नागपुरातील भालदारपुरा परिसर सील : मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश

नागपुरातील भालदारपुरा परिसर सील : मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महानगरपालिका हद्दीतील गांधीबाग-महाल झोनअंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र. १९ मधील भालदारपुरा परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात होऊ नये म्हणून नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता हा परिसर सील करण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी दिले आहेत.
महापालिका हद्दीतील गांधीबाग-महाल झोनअंतर्गत प्रभाग १९ भागातील निश्चित केलेल्या कंटेनमेन्ट एरियानुसार चिटणीस पार्क , अग्रसेन चौक, तारेकर भवन पोस्ट ऑफीस, टाटा पारसी स्कूल आदी क्षेत्र प्रतिबंधित म्हणून घोषित करण्यात आले आहे.
या भागात येणारे व जाणारे सर्व मार्ग तात्काळ बंद करून या भागाच्या सीमा आवागमनासाठी पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी, आवश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खासगी डॉक्टर, परिचारिका, मेडिकल स्टोअर्स दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, रुग्णवाहिका, पोलिस विभागामार्फत पासधारक असलेले जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे व्यक्ती यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.
शहरातील सतरंजीपुरा, शांतिनगर, मोमिनपुरा, गिट्टीखदान, गौतमनगर आधीच हॉटस्पॉट ठरल्याने हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. आता यात भालदारपुऱ्याची भर पडली आहे.

प्रतिबंधित म्हणून घोषित क्षेत्र

  • दक्षिण पूर्वेस ए- चिटणीस पार्क(घाटे रेस्टॉरन्ट)
  • उत्तर पूर्वेस बी- अग्रसेन चौक
  • उत्तर पश्चिमेस सी- तारेकर भवन पोस्ट ऑफिस
  • दक्षिण पश्चिमेस डी- टाटा पारसी स्कूल

Web Title: Seal of Bhaldarpura area in Nagpur: Order of Municipal Commissioner Tukaram Mundhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.