फरार डांगरेची शोधाशोध संशयाच्या भोवऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 12:39 AM2020-07-25T00:39:50+5:302020-07-25T00:41:10+5:30

पोलिसांची तीन पथके कथितरीत्या शोध घेत असेल तर अनेकांचे कोट्यवधी रुपये हडपणारा वादग्रस्त बिल्डर विजय डांगरे पोलिसांना सापडत का नाही, असा संतप्त सवाल डांगरे पीडितांनी केला आहे.

The search for the absconding Dangre is in the whirlpool of suspicion | फरार डांगरेची शोधाशोध संशयाच्या भोवऱ्यात

फरार डांगरेची शोधाशोध संशयाच्या भोवऱ्यात

Next
ठळक मुद्दे तिन्ही पथके सक्रिय असून का सापडत नाही ? : पीडितांचा संतप्त सवाल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलिसांची तीन पथके कथितरीत्या शोध घेत असेल तर अनेकांचे कोट्यवधी रुपये हडपणारा वादग्रस्त बिल्डर विजय डांगरे पोलिसांना सापडत का नाही, असा संतप्त सवाल डांगरे पीडितांनी केला आहे. डांगरेच्या कथित शोधमोहिमेवरही संशय घेतला जात आहे. दरम्यान, डांगरेने अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी धावपळ चालवली आहे.
डांगरेविरुद्ध हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन दोन आठवडे झाले आहे. तेव्हापासून तो फरार आहे. त्याला शोधण्यासाठी हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे एक तसेच गुन्हे शाखेची दोन पथके कामी लागल्याचे पोलीस सांगत आहेत. मात्र तीन पोलीस पथके शोध घेऊनही डांगरेचा पत्ता लागत नसल्यामुळे हे पोलीस शोधमोहिम राबवत आहेत की नुसता दिखावा करत आहेत अशी शंका घेतली जात आहे.
विशेष म्हणजे, परिमंडळ चारचे प्रभारी पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनी डांगरेच्या जुन्या गुन्ह्याचा अहवाल बाहेर काढण्याचे आदेश दिल्यानंतर सक्करदरा तसेच हुडकेश्वर पोलिसांनी जुन्या फाईल शोधल्या. डांगरेने न्यायालयाचा अवमान केलेला आहे. मात्र, डांगरेला शोधण्याची तसदी पोलिसांनी घेतलेली नाही. डांगरे आतापर्यंत पोलिसांच्या सहकार्यामुळेच नागरिकांची फसवणूक करीत होता आणि त्यांना धमक्या देत होता. पीडित मंडळीकडून डांगरे विरुद्ध अनेकदा पोलिसांकडे दाद मागण्यात आली. मात्र पोलिसांनी आतापर्यंत थंड भूमिका बजावल्यामुळेच डांगरेने अनेकांची आयुष्याची पुंजी हडपली आहे. आताही पोलिसांकडून त्याला पकडण्यासाठी फारशी धावपळ केली जात नसल्याचा पीडितांचा आरोप आहे. पोलिसांची तीन पथके १५ दिवसापासून शोधमोहिम राबवत आहे तर त्यांना डांगरे सापडत कसा नाही असा संतप्त सवाल पीडित मंडळी करीत आहेत.

मित्रांकडून मदत
सूत्रांच्या माहितीनुसार पोलीस दलात डांगरेचे काही 'पोलीस मित्र' आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर नेहमीच ते त्याला मदत करतात. याहीवेळी तेच त्याला मदत करून वाचवत असल्याची चर्चा आहे.

Web Title: The search for the absconding Dangre is in the whirlpool of suspicion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.