नव्या कुलगुरूंचा शोध सुरू

By admin | Published: January 13, 2015 01:01 AM2015-01-13T01:01:33+5:302015-01-13T01:01:33+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला लवकरच पूर्णवेळ कुलगुरू मिळणार आहे. कुलगुरूपदाच्या रिक्त जागेसाठी शोध समितीकडून जाहिरात जारी करण्यात आली आहे. ६ फेब्रुवारीपर्यंत इच्छुक

The search for new Vice-Chancellor started | नव्या कुलगुरूंचा शोध सुरू

नव्या कुलगुरूंचा शोध सुरू

Next

नागपूर विद्यापीठ : ६ फेब्रुवारीपर्यंत इच्छुकांकडून मागवले अर्ज
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला लवकरच पूर्णवेळ कुलगुरू मिळणार आहे. कुलगुरूपदाच्या रिक्त जागेसाठी शोध समितीकडून जाहिरात जारी करण्यात आली आहे. ६ फेब्रुवारीपर्यंत इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ही जाहिरात निघाल्यामुळे विद्यापीठ वर्तुळातील राजकारणाला अचानकपणे वेग आला आहे.
डॉ.विलास सपकाळ यांनी मागील वर्षी मार्च महिन्यात राजीनामा दिल्यापासून विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरूंची प्रतीक्षा आहे. २५० महाविद्यालयांच्या प्रवेशबंदीच्या मुद्यावरून डॉ.विलास सपकाळ यांनी राजीनामा दिला. त्यानंतर विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्याकडे प्रभारी कार्यभार देण्यात आला होता. शंभरावा दीक्षांत समारंभ झाल्यानंतर ही जबाबदारी डॉ.विनायक देशपांडे यांना देण्यात आली. त्यानंतर कुलगुरूपदाची निवड प्रक्रिया नेमकी कधी सुरू होणार, याकडे विद्यापीठाचे लक्ष लागले होते.
मुंबई येथे समितीचे अध्यक्ष व सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांच्या उपस्थितीत निवड समितीची बैठक झाली. यात झालेल्या चर्चेनंतर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार इच्छुक उमेदवारांना ६ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करायचे आहेत.
याकरिता अकोला येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मृदा व जलसंधारण अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ.सुभाष टाले यांना संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
उमेदवारांच्या ‘व्हिजन’वर लक्ष
डिसेंबर महिन्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीसाठी समितीची घोषणा करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास एस.सिरपूरकर यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे व वर्धा येथील राष्ट्रीय ग्रामीण औद्योगिक संस्थेचे संचालक डॉ.प्रफुल्लकुमार काळे यांचा समावेश आहे. कुलगुरूंची निवड करताना संबंधित उमेदवारांचे आवश्यक अर्हता, कौशल्य, अनुभव या बाबी तर विचारात घेतल्या जाणारच आहे; पण शिवाय विद्यापीठासाठी त्यांचे पुढील ‘व्हिजन’ काय असणार आहे, यावरदेखील समितीचे लक्ष राहणार आहे.

Web Title: The search for new Vice-Chancellor started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.