सीसीटीव्हीवरून आरोपीचा शोध, चार गुन्हे उघडकीस
By योगेश पांडे | Published: July 14, 2024 06:07 PM2024-07-14T18:07:08+5:302024-07-14T18:15:57+5:30
गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाने ही कारवाई केली.
योगेश पांडे - नागपूर
नागपूर : निर्माणाधीन घरातून इलेक्ट्रीक फिटिंगचे सामान चोरणाऱ्या आरोपीला सीसीटीव्हीच्या फुटेजमुळे अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान एकूण चार गुन्हे उघडकीस आले. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाने ही कारवाई केली.
नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्वराज विहार, वाठोडा ले आऊट येथे ११ जून रोजी निर्माणाधीन घरातून इलेक्ट्रीक फिटिंगसाठी आणललेल्या वायर्स अज्ञात चोरट्याने लंपास केला होत्या. सुभाष काबरा यांच्या तक्रारीवरून नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या पथकाकडून समांतर तपास सुरू होता. खबऱ्यांकडून मिळालेली माहिती तसेच तांत्रिक तपासानंतर पोलिसांनी योगेश उर्फ लक्की रमेश शाहू (२५, महाल) याला ताब्यात घेतले. त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याची तसेच शांतीनगरमध्ये चोरी व धंतोलीत दुखापतीचा गुन्हा केल्याची माहिती दिली. त्याच्या ताब्यातून इलेक्ट्रीक वायरचे बंडल्स, दुचाकी असा २.१३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याला नंदनवन पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे.