नागपुरात भाजपा नगरसेवकांची झाडाझडती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 01:01 AM2018-02-13T01:01:06+5:302018-02-13T01:02:50+5:30

निवडणुकीच्या वेळी आणाभाका घेणारे नगरसेवक निवडून येताच प्रभागाला विसरले आहेत. संपर्क नसल्याने अनेकांना नागरिक ओळखतही नाही. प्रभागातील मूलभूत समस्या व विकास कामांचा अभाव यामुळे नागरिकांत प्रचंड नाराजी आहे. याचा फटका लोकसभा व विधानसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपाच्या नगरसेवकांची झाडाझडती घेतली जाणार आहे.

Search out mission for Nagpur municipal corporator |  नागपुरात भाजपा नगरसेवकांची झाडाझडती!

 नागपुरात भाजपा नगरसेवकांची झाडाझडती!

googlenewsNext
ठळक मुद्देसहा विधानसभा क्षेत्रात आज बैठका : पक्षाच्या बैठकींना अनुपस्थित राहणाऱ्यांना जाब विचारणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निवडणुकीच्या वेळी आणाभाका घेणारे नगरसेवक निवडून येताच प्रभागाला विसरले आहेत. संपर्क नसल्याने अनेकांना नागरिक ओळखतही नाही. प्रभागातील मूलभूत समस्या व विकास कामांचा अभाव यामुळे नागरिकांत प्रचंड नाराजी आहे. याचा फटका लोकसभा व विधानसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपाच्या नगरसेवकांची झाडाझडती घेतली घेणार आहे. मंगळवारी सहा विधानसभा क्षेत्रनिहाय भाजपाचे शहर अध्यक्ष, आमदार यांच्या उपस्थितीत पक्षाचे नगरसेवक, संघटन मंत्री व मंडळ अध्यक्षांच्या बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत.
महापालिका निवडणुकीत मतदारांनी विश्वास दर्शविल्याने भाजपाचे तब्बल १०८ नगरसेवक निवडून आले. एकहाती सत्ता दिली तर प्रभागातील विकास कामांना गती मिळेल, अशी मतदारांना आशा होती. मात्र निवडणुका संपल्यापासून बहुसंख्य नगरसेवकांनी प्रभागातील सर्व वस्त्यांत फेरफटकाही मारलेला नाही. निवडणूक प्रचारात एकत्र फिरून विकासाची ग्वाही देणारे आता आपसात कुरघोडी करीत असल्याचे चित्र आहे. वर्ष झाले तरी भाजपाचे अनेक नगरसेवक सभागृहात मौन बाळगून असतात. यामुळे पक्षाच्या प्रतिमेवर टीका होत आहे.
सत्तापक्ष कार्यालयातील हजेरी पुस्तकात पक्षाचे नगरसेवक हजेरी लावत होते; परंतु वर्षभरात ही प्रथा जवळजवळ बंद आहे. काही मोजकेच नगरसेवक कार्यालयात येतात. सभागृहात नगरसेवकांनी प्रभागातील वा शहर विकासाच्या दृष्टीने विषय मांडणे अपेक्षित आहे. परंतु काही पाच-सात नगरसेवक सोडले तर भाजपाचे नगरसेवक सभागृहात गप्पच असतात. दुसरीकडे पक्षसंघटनेही बहुसंख्य नगरसेवक ांचे योगदान नाही. पक्षाच्या बैठकांनाही उपस्थित नसतात. प्रभागातील विकास कामे करताना नगरसेवक संघटन मंत्री, महामंंत्री यांना विश्वासात घेत नसल्याच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात नगरसेवकांना जाब विचारला जाणार आहे. याला पक्षाच्या नेत्यांनी दुजोरा दिला आहे.
‘केआरए’ तपासणार
गेल्या वर्षभरात नगरसेवकांनी प्रभागात केलेली विकास कामे, पक्षसंघटनेतील योगदान, महापालिकेच्या सभागृहातील योगदान, शासनाच्या तसेच महापालिकेच्या विविध योजना राबविण्यासाठी केलेले प्रयत्न, जनमानसात पक्षाची प्रतिमा उंचावण्यासाठी केलेले प्रयत्न याचा आढावा घेतला जाणार आहे. म्हणजेच बैठकीत नगरसेवकांचा केआरए तपासला जाणार आहे. महापालिकेतील ज्येष्ठ
नगरसेवकांनीही नवीन नगरसेवकांना शिस्त नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: Search out mission for Nagpur municipal corporator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.