‘आर्ची’साठी चाहते सैराट

By admin | Published: September 17, 2016 03:08 AM2016-09-17T03:08:24+5:302016-09-17T03:08:24+5:30

महाराष्ट्रच नव्हे तर देशभराला आपल्या अभिनयाने वेड लावणाऱ्या सैराट चित्रपटातील नायिका ‘आर्ची’ म्हणजेच रिंकू राजगुरू हिने

Seats for 'Archie' | ‘आर्ची’साठी चाहते सैराट

‘आर्ची’साठी चाहते सैराट

Next

रिंकू राजगुरूची हिलटॉपच्या गणेशाला भेट : नागपूरकरांनी केली गर्दी
नागपूर : महाराष्ट्रच नव्हे तर देशभराला आपल्या अभिनयाने वेड लावणाऱ्या सैराट चित्रपटातील नायिका ‘आर्ची’ म्हणजेच रिंकू राजगुरू हिने शुक्रवारी नागपूरकरांनाही वेड लावले. हिलटॉपचा राजा या गणपतीला भेट देण्यासाठी ती आली हेती. यावेळी नागपूरकर चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. आर्चीला एक झलक पाहण्यासाठी चाहते ‘सैराट’ झाले. तिने चाहत्यांकडे पाहताच आणि स्माईल देताच चाहत्यांनी झिंगाट केला.
एकता गणेश उत्सव मंडळाच्या हिलटॉपचा राजा गणपतीच्या भेटीसाठी रिंकू राजगुरू दुपारी १२.३० वाजता येणार होती. नागपुरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे सकाळी ११.३० वाजेपासूनच लोकांनी हिलटॉपमध्ये गर्दी करायला सुरुवात केली होती. दूरवरूनही लोक मोठ्या संख्येने आले होते. हिलटॉप परिसरातील लोक आपापल्या घरावरून, गच्चीवरून मिळेल त्या ठिकाणी वाट पाहात उभे होते. रिंकू राजगुरू हिची लोकप्रियता बघता पोलिसांचाही तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यासोबतच आयोजक असलेल्या गणेश मंडळाचे स्वयंसेवकसुद्धा मोठ्या प्रमाणावर पोलिसांच्या सहकार्यासाठी होते.
दुपारी १.३० वाजता आर्चीला घेऊन आ. प्रकाश गजभिये आले. परंतु लोकांची गर्दी इतकी होती की, आर्चीला गाडीतून उतरण्यासाठी तब्बल १५ मिनिटे लागली. तेव्हापर्यंत स्वयंसेवक, पोलीस आणि स्वत: आमदार गजभिये यांनी गर्दीला दूर करण्याचा प्रयत्न केला. आर्चीच्या हातून आरती करण्यात आली. गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर मुख्य स्टेजकडे नेण्यात आले. याठिकाणी मोठ्या प्रमाणात नागपूरकर चाहते आर्चीची प्रतीक्षा करीत होते. ती व्यासपीठावर येताच चाहते आर्ची-आर्ची म्हणून ओरडू लागले. माजी मंत्री अनिल देशमुख, आ. प्रकाश गजभिये यांनी रिंंकू राजगुरू हिचा नागपूरकरांच्यावतीने सत्कार केला. यावेळी रिंकूचे वडील महादेव राजगुरू उपस्थित होते. (प्रतिनिधी)

ट्रान्सफॉर्मरवर चढलेल्या
युवकाला लागला शॉक

आर्चीला एक नजर पाहण्यासाठी चाहत्यांची पळापळ सुरू होती. स्टेज दूर असल्याने तिला व्यवस्थित पाहता यावे, म्हणून कुणी इमारतीवर, बालकनीत तर कुणी भिंतीवर चढले होते. काही मुले कम्पाऊंड वॉलच्या भिंतीवर चढली. त्याच्या बाजूलाच असलेल्या ट्रान्सफॉर्मरला पकडून काही मुले उभी होती. यात अक्षय नावाच्या मुलाला जोरदार करंट बसला व तो ट्रान्सफॉर्मरला चिकटला. त्याच्यासोबतची इतर मुले पळाली. एका वृद्ध व्यक्तीने इमारतीवरून पोलिसांना मुलाला करंट लागल्याचा इशारा केला. पोलिसांनी धावपळ केली. धंतोली पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजन माने व त्यांच्या पथकाने तत्परता दाखवित त्या मुलाला काठीच्या मदतीने दूर केले. यात आक्षयचा हात भाजला गेला. त्याला लगेच उपचारासाठी रवाना करण्यात आले.

दोन कारचेही नुकसान
आर्चीला पाहण्यासाठी अनेक चाहते कारवर सुद्धा चढले. चाहत्यांच्या वजनामुळे दोन कारचे चांगलेच नुकसान झाले.
नागपूरकरांचे आभार
यावेळी आपल्या सत्काराला उत्तर देताना आर्ची ऊर्फ रिंकू राजगुरू हिने हात उंचावून सर्व चाहत्यांचे, नागपूरकरांचे आभार मानले.

Web Title: Seats for 'Archie'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.