दपूम रेल्वेने ११८३ कोचमध्ये लावले ४१८८ बायो टॉयलेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 09:52 PM2019-07-11T21:52:17+5:302019-07-11T21:53:37+5:30
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने पर्यावरणाच्या संरक्षणासाठी पुढाकार घेऊन विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने जून २०१९ पर्यंत ११८३ कोचमध्ये ४१८८ बायो टॉयलेट लावले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेनेपर्यावरणाच्या संरक्षणासाठी पुढाकार घेऊन विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने जून २०१९ पर्यंत ११८३ कोचमध्ये ४१८८ बायो टॉयलेट लावले आहेत.
रेल्वेस्थानकाचा परिसर, प्लॅटफार्म, रेल्वे रुळांना घाणीपासून दूर ठेवणसाठी तसेच वातावरण स्वच्छ ठेवून पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वेगाड्यातील कोचमध्ये बायो टॉयलेट लावण्यात येत आहेत. बायो टॉयलेट पर्यावरणासाठी अनुकुल असून याद्वारे मानवाचे मलमूत्र ६ ते ८ तासात पाणी आणि वायूत रुपांतरित होते. त्यापासून दुर्गंधी येत नसून कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. यामुळे रेल्वेस्थानक आणि रुळांच्या आजूबाजूला स्वच्छता राखणे शक्य होत आहे. प्रवाशांनी बायो टॉयलेट स्वच्छ ठेवण्यासाठी त्यात चहाचे कप, पाण्याच्या बॉटल, गुटख्याच्या पुड्या, पॉलिथीन, डायपर टाकू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
६.१८ लाख वृक्ष लावले
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने मागील ७ वर्षात लाखो वृक्ष लावले आहेत. २०१५-१६ मध्ये २ लाख ७३ हजार , २०१६-१७ मध्ये ९ लाख ३४ हजार, २०१७-१८ मध्ये ४ लाख आणि २०१८-१९ मध्ये ६ लाख १८ हजार वृक्ष लावले आहेत. २०१९-२० या वर्षात दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने ८ लाख वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.