४५ वर्षांवरील नागरिकांना दुसरा डोस उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:08 AM2021-05-14T04:08:37+5:302021-05-14T04:08:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य शासनाच्या निर्देशानुसार केवळ ४५ वर्षांवरील नागरिकांना शुक्रवारी लसीकरणाचा दुसरा डोस दिला जाईल. ...

Second dose available to citizens above 45 years | ४५ वर्षांवरील नागरिकांना दुसरा डोस उपलब्ध

४५ वर्षांवरील नागरिकांना दुसरा डोस उपलब्ध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्य शासनाच्या निर्देशानुसार केवळ ४५ वर्षांवरील नागरिकांना शुक्रवारी लसीकरणाचा दुसरा डोस दिला जाईल. शासनाने या वयोगटातील नागरिकांना दुसरा डोस देण्यासाठी लस उपलब्ध केली आहे. मनपाच्या सर्व ९६ केंद्रांवर लसीकरण केले जाईल. पुढील आदेशापर्यंत फक्त दुसरा डोस नागरिकांना दिला जाईल.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल कॉलेज), डॉ. आंबेडकर रुग्णालय, इंदोरा व स्व. प्रभाकर दटके महाल रोग निदान केंद्र येथे कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस उपलब्ध आहे. अन्य केंद्रांवर कोविशिल्डचा दुसरा डोस दिला जात आहे. १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण राज्य शासनाच्या निर्देशानुसार सध्या स्थगित करण्यात आले आहे, अशी माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.

Web Title: Second dose available to citizens above 45 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.