१८ वर्षांवरील नागरिकांना कोव्हॅक्सिनचा आजपासून दुसरा डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:06 AM2021-06-04T04:06:55+5:302021-06-04T04:06:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : १८ ते ४४ वयोगटातील ज्या नागरिकांनी मनपा रुग्णालयात पहिला डोस घेतला आहे ...

Second dose of covacin to citizens above 18 years of age from today | १८ वर्षांवरील नागरिकांना कोव्हॅक्सिनचा आजपासून दुसरा डोस

१८ वर्षांवरील नागरिकांना कोव्हॅक्सिनचा आजपासून दुसरा डोस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : १८ ते ४४ वयोगटातील ज्या नागरिकांनी मनपा रुग्णालयात पहिला डोस घेतला आहे त्यांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस आज शुक्रवारपासून दिला जाणार आहे. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल कॉलेज) व स्व. प्रभाकर दटके मनपा महाल रोगनिदान केंद्र येथे कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस दिला जाईल. यासाठी त्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशनचा पर्याय उपलब्ध आहे.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांना कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जात आहे. ही लस सर्व केंद्रांवर उपलब्ध आहे. तसेच "लसीकरण आपल्या परिसरात" मोहिमेंतर्गतसुद्धा कोविशिल्ड लस दिली जाईल. केंद्र शासनाच्या नवीन निर्देशानुसार ज्या नागरिकांना कोविशिल्डचा पहिला डोस १२ आठवड्यापूर्वी घेतला त्यांना दुसरा डोस दिला जाईल. आरोग्य सेवक, फ्रंटलाईन वर्कर यांनासुद्धा दुसरा डोस दिला जाणार आहे. तसेच ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन केंद्रावर ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण होईल. तसेच मेडिकल कॉलेज, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, सिद्धार्थनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व स्व. प्रभाकर दटके मनपा महाल रोगनिदान केंद्र येथे कोव्हॅक्सिनचा फक्त दुसरा डोस ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी उपलब्ध आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.

.........

नागपुरात लसीकरणाची अद्ययावत स्थिती (२ जून)

पहिला डोस

आरोग्य सेवक- ४५,६०७

फ्रंटलाईन वर्कर- ५२,९३६

१८ वयोगट- (सध्या बंद आहे)

४५ वयोगट- १,३५,२९७

४५ कोमार्बिड - ८३,६२९

६० सर्व नागरिक-१,७७,१०६

पहिला डोस - एकूण - ५,०५,७१६

दुसरा डोस-

आरोग्य सेवक - २३,३३२

फ्रंटलाईन वर्कर- १९,५९४

४५ वयोगट- २९,६०८

४५ कोमार्बिड - १८,५२१

६० सर्व नागरिक- ७४,११६

दुसरा डोस - एकूण - १,५६,१७७

संपूर्ण लसीकरण एकूण - ६,७०,८९३

Web Title: Second dose of covacin to citizens above 18 years of age from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.