सिंगलकर कुटुंबीयांची दुसरी पिढी देशसेवेसाठी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:08 AM2021-03-10T04:08:34+5:302021-03-10T04:08:34+5:30
- सिद्धांतची एनडीएसाठी निवड लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भारतीय वायुसेनेतून निवृत्त झालेले संदेश सिंगलकर यांचे चिरंजीव सिद्धांत सिंगलकर ...
- सिद्धांतची एनडीएसाठी निवड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय वायुसेनेतून निवृत्त झालेले संदेश सिंगलकर यांचे चिरंजीव सिद्धांत सिंगलकर यांची नॅशनल डिफेन्स अकादमी(एनडीए)साठी निवड झाली आहे. देशसेवेसाठी सज्ज असलेली सिंगलकर कुटुंबीयांची ही दुसरी पिढी आहे.
एनडीएच्या मार्च २०२१ पासून सुरू होणाऱ्या १४५ व्या कोर्ससाठी यूपीएससीतर्फे जाहीर झालेल्या ऑल इंडिया मेरिट लिस्टमध्ये सिद्धांतने २०९ व्या क्रमांकावर स्थान मिळविले आहे. सिद्धांतचे वडील संदेश सिंगलकर भारतीय वायुसेनेत कार्यरत होते. आई स्मिता हायकोर्ट वकील आहेत तर लहान भाऊ शौर्य १० वीचा विद्यार्थी आहे. नीरी मॉडर्न स्कूल नागपूरहून मॅट्रिक झाल्यावर नागपूरच्या ‘दि फोर्सेस फाऊंडेशन’चे संचालक लेफ्टनंट कर्नल महेश देशपांडे आणि स्फूर्ती एम. देशपांडे यांनी त्याला औरंगाबादच्या सर्व्हिसेस प्रीपरेटरी इन्स्टिट्यूट(एस.पी.आय.)मध्ये प्रवेशासाठी प्रशिक्षण दिले. सिद्धांतची लहानपणापासून सैन्यात जाऊन देशसेवा करण्याची इच्छा होती, जी योग्य मार्गदर्शन व मेहनतीने पूर्ण झाली. त्याला एसपीआयचे संचालक सेवानिवृत्त कर्नल अमित दळवी यांचेही मार्गदर्शन लाभले.
.......