नागपुरात दुसरी धावपट्टी दुसऱ्या टप्प्यात बनणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 09:59 AM2019-04-18T09:59:32+5:302019-04-18T10:02:21+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हस्तांतरणाच्या नऊ वर्षांनंतर खासगी भागीदाराची घोषणा करण्यात आली आहे.

Second runway in Nagpur will be in second phase | नागपुरात दुसरी धावपट्टी दुसऱ्या टप्प्यात बनणार

नागपुरात दुसरी धावपट्टी दुसऱ्या टप्प्यात बनणार

Next
ठळक मुद्देजीएमआर कंपनी खासगी भागीदारीच्या गुंतवणुकीत प्राथमिकता

वसीम कुरैशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हस्तांतरणाच्या नऊ वर्षांनंतर खासगी भागीदाराची घोषणा करण्यात आली आहे. आता भागीदार गुंतवणुकीची प्राथमिकता ठरवीत असून, त्या अंतर्गत आता पहिल्याऐवजी दुसऱ्या टप्प्यात दुसरी धावपट्टी तयार होणार आहे.
दुसरी धावपट्टी पहिल्या टप्प्यात का तयार होणार नाही, यावर अधिकाऱ्यांनी खुलासा केलेला नाही. पण पहिल्या धावपट्टीलगत असलेल्या उंच इमारतींमुळे उड्डाणांची संख्या कमी झाल्यामुळे कंपनीने दुसऱ्या धावपट्टीचे बांधकाम दुसऱ्या टप्प्यात करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. दुसरी धावपट्टी चार हजार मीटर लांब राहणार असून, जगातील सर्वात मोठे प्रवासाी विमान एअरबस-३८० उतरू शकेल, अशी धावपट्टी क्षमता राहील.
वर्धा रोड आणि जयताळा या मार्गाकडे असलेली पहिली धावपट्टी ३२०० मीटर लांब आहे. पण या मार्गावर निर्मित दोन उंच इमारतींमुळे धावपट्टीची लांबी ५६० मीटरने कमी करण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. या इमारतींना मिहान इंडिया लिमिटेडने नोटीस बजावून मंजुरी रद्द केली होती. एअरोनॉटिकल आॅब्सटिकल सर्वेक्षणानंतरही दोन्ही इमारतींच्या उंचीबाबत काहीही कारवाई करण्यात आलेली नाही.

नवीन टर्मिनल इमारतीला प्राथमिकता
पहिल्या टप्प्यात ६४ हजार मीटर क्षेत्रफळ जागेत (६४ हेक्टर) नवीन टर्मिनल इमारत उभी राहणार आहे. कमी वेळेत जास्त महसूल मिळविण्यासाठी कंपनीने प्राधान्य दिले आहे. जीएमआर कंपनीकडे आॅक्टोबर २०१९ पर्यंत विमानळाचे हस्तांतरण करण्यात येणार आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी मिहान इंडिया लिमिटेड संचालकांच्या बैठकीत १४.४९ टक्के महसूल वितरणावर जीएमआरला नागपूर विमानतळ देण्याचा निर्णय घेण्यात आला. एएआयने या निर्णयाला सहमती दर्शविली आहे. एएआय पूर्वीच्या ५.७६ टक्के महसूल वितरणावर संतुष्ट नव्हता.

Web Title: Second runway in Nagpur will be in second phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.