दुसरी धावपट्टी ट्रॅकवर
By admin | Published: May 16, 2015 02:33 AM2015-05-16T02:33:43+5:302015-05-16T02:33:43+5:30
केंद्रीय राखीव पोलीस दलाची (सीआरपीएफ) शिवणगाव परिसरातील २.३ हेक्टर जमीन राज्य सरकारला हस्तांतरित करण्यात आली आहे.
नागपूर : केंद्रीय राखीव पोलीस दलाची (सीआरपीएफ) शिवणगाव परिसरातील २.३ हेक्टर जमीन राज्य सरकारला हस्तांतरित करण्यात आली आहे. याबाबत अलीकडेच मुंबई येथील महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) मुख्य कार्यालयास १४ मे रोजी सीआरपीएफच्या दिल्ली येथील कार्यालयाकडून एक पत्र प्राप्त झाले आहे. यामुळे प्रस्तावित दुसऱ्या धावपट्टीच्या मार्गातील अडथळा दूर झाला आहे. ही जागा मिळविण्यासाठी एमएडीसी गत दीड ते दोन वर्षांपासून पाठपुरावा करीत होती. अखेर १४ मे रोजी त्या प्रयत्नांना यश आले आहे. एमएडीसी या जागेच्या बदल्यात सीआरपीएफला शिवणगाव परिसरातच दुसरी २.३ हेक्टर जागा देणार आहे.
विशेष म्हणजे, अलीकडेच गजराजची जागा एमएडीसीला हस्तांतरित करण्यात आली आहे. त्या पाठोपाठ आता सीआरपीएफची जागा सुद्धा मिळाली आहे. या घडामोडीमुळे मिहान प्रकल्पाला नक्कीच गती मिळाणार आहे. (प्रतिनिधी)