नागपूर हिवाळी अधिवेशन लागोपाठ रद्द होण्याची ही दुसरी वेळ!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 08:30 PM2021-11-29T20:30:10+5:302021-11-29T20:30:49+5:30

Nagpur News सलग दोन वर्षे हिवाळी अधिवेशन नागपुरात न होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी वर्ष १९६२ आणि १९६३ मध्येही सलग दोन वर्षे नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन झाले नव्हते.

This is the second time in a row that the Nagpur Winter Convention has been canceled | नागपूर हिवाळी अधिवेशन लागोपाठ रद्द होण्याची ही दुसरी वेळ!  

नागपूर हिवाळी अधिवेशन लागोपाठ रद्द होण्याची ही दुसरी वेळ!  

googlenewsNext
ठळक मुद्देएकदा भारत-चीन युद्धामुळे तर दुसऱ्या वर्षी माजी मुख्यमंत्री कन्नमवार यांच्या निधनामुळे रद्द झाले होते हिवाळी अधिवेशन

नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन वर्ष २०२० प्रमाणेच २०२१ मध्ये सलग दुसऱ्या वर्षीही नागपुरात होणार नाही. तसे पाहता सलग दोन वर्षे हिवाळी अधिवेशन नागपुरात न होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी वर्ष १९६२ आणि १९६३ मध्येही सलग दोन वर्षे नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन झाले नव्हते.

वर्ष १९६० मध्ये नागपूर राजधानीचा दर्जा सोडून महाराष्ट्रात विलीन झाले होते. या श्रृंखलेत नागपूर करारानुसार महाराष्ट्र विधिमंडळाच्या एका सत्राचे आयोजन नागपुरात करण्यावर सहमती झाली होती. त्याअंतर्गत हिवाळी अधिवेशन नागपूर होऊ लागले. पण वर्ष १९६२ मध्ये भारत-चीन युद्धामुळे अधिवेशनाला ब्रेक लागला. तर दुसऱ्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांच्या निधनामुळे हिवाळी अधिवेशन टाळावे लागले. त्यानंतर नियमित अधिवेशन नागपुरात होऊ लागले, पण वर्ष १९७९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या घोषणेमुळे आणि वर्ष १९८५ मध्ये मुंबईत काँग्रेसच्या शताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमामुळे नागपुरात अधिवेशन झाले नाही. आता वर्ष २०२० मध्ये कोविड संक्रमण आणि २०२१ मध्ये मुख्यमंत्र्यांचे स्वास्थ्य व कोविडच्या पार्श्वभूमीवर नागपूरऐवजी मुंबईत अधिवेशन होणार आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन एक वेळही नाही; पण चार वेळा पावसाळी अधिवेशन

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात घेण्याची मागणी केली आहे. नागपूर महाराष्ट्राची राजधानी झाल्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात कधीच झाले नाही. पण चार वेळा मान्सून सत्र झाले आहेत. पहिला वर्ष १९६१ मध्ये आणि त्यानंतर १९६६ आणि १९७१ मध्ये झाले. वर्ष २०१८ मध्ये मान्सून सत्र विधानभवन परिसरात मुसळधार पावसामुळे जलमय झाल्यामुळे चर्चेत राहिला.

वर्ष आणि अधिवेशन न झाल्याची कारणे :

- १९६२ : भारत-चीन युद्ध

- १९६३ : तत्कालीन मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांचे निधन

- १९७९ : लोकसभा निवडणुकीची घोषणा

- १९८५ : मुंबईत काँग्रेसचा शताब्दी महोत्सव

- २०२० : कोविड संक्रमण

- २०२१ : मुख्यमंत्र्यांचे स्वास्थ्य

Web Title: This is the second time in a row that the Nagpur Winter Convention has been canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.