...तर दुसरी पत्नी पोटगीस अपात्र : हायकोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 05:16 AM2021-03-02T05:16:41+5:302021-03-02T05:16:59+5:30
प्रज्ञाने पोटगी मिळण्यासाठी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली. २८ जानेवारी २०१६ रोजी कुटुंब न्यायालयाने प्रज्ञाचे अविनाशसोबतचे लग्न अवैध ठरवून पोटगी मंजूर करण्यास नकार दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अवैध लग्न करणाऱ्या पत्नीला पोटगी दिली जाऊ शकत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व पुष्पा गणेडीवाला यांनी एका प्रकरणात दिला.
नागपूर येथील प्रज्ञा व अविनाश (बदललेली नावे) यांनी १३ मे २००७ रोजी लग्न केले होते. अविनाशचे हे दुसरे लग्न होते. त्यावेळी त्याने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नव्हता. त्याचे पहिले लग्न कायम होते. त्यामुळे त्याचे प्रज्ञासोबतचे लग्न अवैध ठरले. ते लग्नानंतर काही दिवस आनंदात सोबत राहिले. पुढे त्यांच्यात वाद व्हायला लागले. त्यांचे सतत भांडणे होत होती. ६ एप्रिल २००९ पासून दोघेही वेगळे झाले.
प्रज्ञाने पोटगी मिळण्यासाठी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली. २८ जानेवारी २०१६ रोजी कुटुंब न्यायालयाने प्रज्ञाचे अविनाशसोबतचे लग्न अवैध ठरवून पोटगी मंजूर करण्यास नकार दिला. त्या निर्णयाविरुद्ध तिने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता कुटुंब न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार देऊन प्रज्ञाचे अपील फेटाळून लावले. पुढे त्यांच्यात वाद व्हायला लागले. त्यांचे सतत भांडणे होत होती.