महाव्यवस्थापकांकडून नागपूर-बडनेरा मार्गासह वर्धा स्थानकाचे सिक्युरिटी ऑडिट
By नरेश डोंगरे | Published: November 25, 2024 06:21 PM2024-11-25T18:21:24+5:302024-11-25T18:53:22+5:30
Nagpur : क्रॉसओव्हर पॉइंट, विंडो ट्रेलिंगची सूक्ष्म तपासणी
नरेश डोंगरे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मिना यांनी नागपूर-बडनेरा मार्गासह अचानक वर्धा रेल्वे स्थानक आणि नजिकच्या परिसराचा दाैरा करून सुरक्षेचे ऑडिट केले. त्यांनी क्रॉसओव्हर पॉइंट, विंडो ट्रेलिंगची सूक्ष्म तपासणी करून वास्तव जाणून घेतले.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे नागपूर दाैऱ्यावर येणार असल्याचे आधीच घोषित झाल्यामुळे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मिना यांचीही या दाैऱ्यात उपस्थिती अपेक्षितच होती. मिना यांनी आपल्या या विदर्भ दाैऱ्यादरम्यान मुंबई-नागपूर मार्गावरील वर्धा रेल्वे स्थानकावर भेट देऊन तेथील प्रवाशांच्या सुविधा आणि सुरक्षेच्या अनेक बाबींची सूक्ष्म तपासणी केली. त्यांनी नागपूर बडनेरा मार्गावरची विंडो ट्रेलिंग तपासली. अपघाताच्या वेळी अत्यंत महत्वाची भूमीका वठविणारी ' हेल्प ट्रेन' किती सुसज्ज आहे, त्यात काय सुविधा आहे काय नाही, त्याची तपासणी केली. क्रॉसओव्हर पॉईंट १०२/ बी ची तपासणी केल्यानंतर मिना यांनी विंड्रो ट्रेलिंगकडे मोर्चा वळविला आणि नागपूर वर्धा बडनेरा मार्गावरची विंडो ट्रेलिंग तपासली. ट्रॅक कंडिशन आणि सिग्नल सिस्टमचीही बारिकसारिक पाहणी केल्यानंतर मिना यांनी 'ऑल वेल'ची प्रतिक्रिया देत समाधान व्यक्त केले.