नागपुरातील चार नवीन मेट्रो स्टेशनची सुरक्षा आयुक्तांनी केली तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 01:28 AM2020-09-23T01:28:10+5:302020-09-23T01:29:28+5:30

मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) जनककुमार गर्ग आणि त्यांच्या चमूने २१ सप्टेंबरला ऑरेंज लाईन (रिच-१), अ‍ॅक्वा लाईन (रिच-३) मार्गातील अजनी चौक व रहाटे कॉलनी आणि एलएडी चौक व बन्सीनगर या नवीन चार मेट्रो स्टेशनची पाहणी करून सोईसुविधा आणि तांत्रिक बाबींचा आढावा घेतला आणि समाधान व्यक्त केले.

Security commissioner inspects four new metro stations in Nagpur | नागपुरातील चार नवीन मेट्रो स्टेशनची सुरक्षा आयुक्तांनी केली तपासणी

नागपुरातील चार नवीन मेट्रो स्टेशनची सुरक्षा आयुक्तांनी केली तपासणी

googlenewsNext
ठळक मुद्देसोईसुविधा व तांत्रिक बाबींचा घेतला आढावा : लवकरच प्रमाणपत्र मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) जनककुमार गर्ग आणि त्यांच्या चमूने २१ सप्टेंबरला ऑरेंज लाईन (रिच-१), अ‍ॅक्वा लाईन (रिच-३) मार्गातील अजनी चौक व रहाटे कॉलनी आणि एलएडी चौक व बन्सीनगर या नवीन चार मेट्रो स्टेशनची पाहणी करून सोईसुविधा आणि तांत्रिक बाबींचा आढावा घेतला आणि समाधान व्यक्त केले.
गर्ग यांनी स्टेशनच्या कार्याची प्रशंसा केली. महामेट्रोला स्थानकांचे प्रमाणपत्र मिळण्याचा विश्वास असून नव्याने मेट्रो सेवा सुरू होईल. १२ मेट्रो स्टेशनऐवजी आता १६ मेट्रो स्टेशनवरून मेट्रो सेवा सुरूहोऊ शकेल. अधिकाऱ्यांनी एएफसी गेट, इमर्जन्सी कॉल पॉईंट, प्लॅटफार्म परिसरातील इमर्जन्सी स्टॉप प्लंगर, लिफ्ट, प्रसाधनगृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बेबी केअर रूम, दिव्यांगाकरिता विशेष प्रसाधनगृह, मार्गदर्शिका, सूचना बोर्ड, सिग्नलिंग उपकरण खोली, टेलिकॉम उपकरण खोली, ट्रान्सफार्मर, स्टेशन नियंत्रण कक्ष व विविध सुरक्षा नियमांची पाहणी केली. यावेळी प्रात्यक्षिक करण्यात आले. संभाव्य आणीबाणीच्या परिस्थितीत करायच्या उपाययोजनांची समीक्षा त्यांनी केली. या प्रसंगी वेगवेगळ्या मॉक ड्रीलचे आयोजन करण्यात आले. गर्ग यांनी १३२ केव्ही व्हॅट रिसिव्हिंग सबस्टेशनची पाहणी करून प्रशंसा केली.
दौऱ्यात संचालक (प्रकल्प) महेश कुमार, कार्यकारी संचालक अरुण कुमार, जे. पी. डेहरीया, अनिल कोकाटे, महाव्यवस्थापक सुधाकर उराडे, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (ओएचई) नामदेव रबडे, उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक विद्यासागर, नरेंद्र उपाध्याय तसेच जनरल कन्स्लटंटचे परतेती व इतर अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Security commissioner inspects four new metro stations in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.