नागपुरात अवैध शस्त्रांसह सुरक्षा रक्षकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 10:04 PM2019-08-02T22:04:50+5:302019-08-02T22:27:12+5:30

बंदूक, कट्टा आणि पिस्तुल ठेवून सेक्युरिटीचे काम करणारा मध्यप्रदेशचा एक व्यक्ति पोलिसांच्या हाती लागला आहे. बजाजनगर पोलिसांनी त्याला अटक करून शस्त्र आणि काडतूस जप्त केले आहे.

Security guard arrested with illegal weapons in Nagpur | नागपुरात अवैध शस्त्रांसह सुरक्षा रक्षकास अटक

नागपुरात अवैध शस्त्रांसह सुरक्षा रक्षकास अटक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बंदूक, कट्टा आणि पिस्तुल ठेवून सेक्युरिटीचे काम करणारा मध्यप्रदेशचा एक व्यक्ति पोलिसांच्या हाती लागला आहे. बजाजनगर पोलिसांनी त्याला अटक करून शस्त्र आणि काडतूस जप्त केले आहे. तो बोगस दस्तावेजाच्या मदतीने शस्त्र घेऊन दहा वर्षांपासून येथे राहत होता. यासाठी त्याची मदत करणाऱ्यांचाही पोलीस शोध घेत आहे. स्वामीप्रसाद रुद्रमणी प्रसाद दुबे (४३) रा.काचीपुरा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 


आरोपी दुबे हा मुळचा मध्यप्रदेशातील रीवा येथील रहिवासी आहे. तो २००९ पासून नागपुरात राहत आहे. तो खासगी सुरक्षा गार्डचे काम करतो. दुबे रिवामध्येही सुरक्षा रक्षक होता. त्याच्याजवळ बारा बोरची परवाना असलेली बंदुक होती. नागपुरात अधिक वेतन आणि सुविधा मिळत असल्यामुळे तो येथे येऊन सुरक्षा गार्डचे काम करू इच्छीत होता. त्याच्या बंदुकीचा परवाना मध्यप्रदेशातील होते. त्यामुळे ते नागपुरात चालू शकणार नव्हते. याची माहिती होताच दुबेने बंदुकीचा परवाना ऑल इंडिया करण्याचा निर्णय घेतला. त्याने रिवा येथे एका स्टॅम्प पेपर वेंडर आमि सुनित मिश्रा नावाच्या नातेवाईकाशी याबाबत चर्चा केली. दोघांनीही त्याला ऑल इंडिया लायसन्स बनवून देण्याचे आमीष दखविले. दुबेही त्यांच्या सांगण्यानुसार वागण्यास तयार झाला. त्या दोघंनी सांगितल्यानुसार दुबेने आपल्या परवान्यात खोडखाड करीत त्यावर ‘ऑल इंडिया’ अशी नोंद केली. ते लायसन्स घेऊन तो २००९ मध्ये नागपुरात येऊन नोकरी करू लागला.
बजाजनगर पोलिसांना दुबेजवळ अवैध शस्त्र असल्याची माहिती मिळाली. या आधारावर पोलिसांनी त्याच्या घरावर धाड टाकली. तेथे पोलिसांना बारा बोरची बंदुक, कट्टा, एअर गन, ८ काडतूस आणि दस्तावेज सापडले. दस्तावेजांची तपासणी केली असता पोलिसांना संशय आला. दुबेला विचारपूस केली तेव्हा खरा प्रकार उघडकीस आला.
१९९० मध्ये दुबेच्या गावावर दरोडेखोरांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात दुबेच्या आते भावाचा मृत्यू झाला. तर वडील जख्मी झाले होते. या हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणामुळे दुबेने देशी कट्टा खरेदी केला. पीडित असल्याने सरकारनेही परवाना जारी केला. बंदुकीचा परवाना मिळाल्याने आपल्याकडे अवैध शस्त्र असल्याचे कुणाला कळणार नाही, याची त्याला खात्री पटली. यानंतर त्याने एअर गन खरेदी केली. २००९ मध्ये परवाना ऑल इंडिया बनवण्यासाठी त्याने वेगळीच शक्कल लढवली. त्याने रिवा जिल्हाधिकाऱ्याच्या नावाने जारी झालेले बोगस आदेश बनवले. त्यात गृह विभागाच्या आदेश संख्येचा उल्लेख करीत शस्त्र परवान्याची सीमा ऑल इंडिया करण्यात येत असल्याचा उल्लेख होता. 
 ऑल इंडिया शस्त्र जारी करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना नाहीत. गृह मंत्रालय हेच सक्षम प्राधिकरण आहे. याबाबत पोलिसांना माहिती असल्याने त्यांना रिवा जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश बोगस असल्याचा संशय आला. पोलिसांनी सक्तीने विचारपूस करताच दुबेने आपला गुन्हा कबूल केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या बोगस आदेशासोबतच दुबेने छिंदवाडा पोलीस आणि शस्त्र डीलरचे रबर स्टॅम्पही बोगस बनवले होते. त्यावरही शस्त्र परवाना ऑल इंडिया करण्यात येत असल्याचा उल्लेख होता. पोलीस दुबेचा नातेवाईक व स्टॅम्प व्हेंडरच्या शोधासाठी मध्य प्रदेशातही गले होते. परंतु दोघाचाही पत्ता लागला नाही. दुबेच्या कुटुंबात पत्नी आणि दोन विवाहित मुली आहेत. चांगली नोकरी मिळवण्याच्या आमिषामुळे बोगसपणा केल्याने त्याला तुरुंगाची हवा खावी लागत आहे. तो ३ ऑगस्टपर्यंत पोलिसांच्या कोठडीत आहे. 
 
 शस्त्र परवान्याचे दर तीन वर्षानंतर नुतनीकरण केले जाते. मूळ परवान्यात खोडखाड केल्याने त्याचे नुतनीकरण शक्य नव्हते. यामुळे दुबेने रिवा पोलिसांकडे परवाना हरवल्याची तक्रार दाखल केली होती. या आधारावर दुबेने डुप्लिकेट परवाना मिळवला होता. याचप्रकारे तो शस्त्र डीलरच्या बोगस सही शिक्क्याचा वापर करून काडतूसच्या संख्येतही गोलमाल करीत होता. दुबेचे कृत्य पाहून पोलीसही आश्चर्यचकित आहे. 

Web Title: Security guard arrested with illegal weapons in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.