सुरक्षा रक्षक कंत्राटाची आयुक्तांनी चौकशी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:07 AM2021-06-23T04:07:40+5:302021-06-23T04:07:40+5:30
महापौरांचे निर्देश : व्याज कमी करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घ्या लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेतील सुरक्षारक्षक मे. ...
महापौरांचे निर्देश : व्याज कमी करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घ्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेतील सुरक्षारक्षक मे. किशोर एजन्सी आणि मे. सुपर सिक्युरिटी सर्व्हिसेस यांच्याकडील अनुज्ञप्तीची मुदत संपल्यानंतरही त्यांचे कंत्राट कसे काय सुरू होते, या नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या मुद्याची गांभीर्याने दखल घेत आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करावी. असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी मंगळवारी महासभेत दिले.
नगरसेवक धर्मपाल मेश्राम यांनी नोटीसच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित केला. दोन्ही एजन्सीच्या कंत्राटाची पोलिस अनुज्ञप्तीची मुदत २८ जुलै २०२० रोजी संपली होती. परंतु सामान्य प्रशासन विभागातर्फे कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असा मुद्दा मेश्राम यांनी उपस्थित केला. यावर समाधानकारक उत्त्रर न मिळाल्याने त्यांनी महापौरांना स्वत: निर्णय घेण्याची विनंती केली. यावर महापौरांनी आयुक्तांना चौकशी करून व संबंधित नगरसेवकांना उत्तर देण्याचे निर्देश दिले.