विमानतळाची सुरक्षा धोक्यात

By admin | Published: January 6, 2016 03:39 AM2016-01-06T03:39:55+5:302016-01-06T03:39:55+5:30

उपराजधानीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सुरक्षासंबंधीच्या त्रुटी नेहमीच चर्चेचा विषय राहिल्या आहेत.

Security threat to the airport | विमानतळाची सुरक्षा धोक्यात

विमानतळाची सुरक्षा धोक्यात

Next

कार्गो स्कॅनिंग मशीन बंद : पार्सल अडले ; प्रशासन घेणार का दखल ?
नागपूर : उपराजधानीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सुरक्षासंबंधीच्या त्रुटी नेहमीच चर्चेचा विषय राहिल्या आहेत. सध्या येथील कार्गो स्कॅनिंग मशीन बंद पडल्याने पुन्हा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
विमानातून पाठविण्यात येणाऱ्या कार्गो व पार्सलच्या तपासणीत अडचणी येत आहे. येथे लावण्यात आलेल्या दोन्ही कार्गो स्कॅनिंग मशीन ठप्प झाल्या आहेत. विशेष म्हणजे, पठाणकोट एअरबेसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील सर्व विमानतळावर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सुरक्षेकडे डोळेझाक कशासाठी?
नागपूर : नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा सुद्धा समावेश आहे. शिवाय नागपूर विमानतळ हे देशातील संवेदनशील विमानतळापैकी एक आहे. असे असताना येथील सुरक्षेकडे डोळेझाक केली जात आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी देशात पार्सल बॉम्बच्या माध्यमातून घातपात झाला आहे. तरी सुद्धा येथील सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात आहे.
अधिक शुल्क वसुली
सध्या विमानतळावर मशीनऐवजी साधी (मॅन्युअल) तपासणी केली जात आहे. परंतु त्यासाठी अतिरिक्त शुल्क वसूल केले जात आहे. माहिती सूत्रानुसार मशीनद्वारे करण्यात येणाऱ्या कार्गो स्कॅनिंगसाठी ६०० रुपये शुल्क आकारल्या जात होते. परंतु सध्या ते २४०० रु. घेतले जात आहे. शिवाय मॅन्युअल तपासणीत पैसा व वेळ दोन्हीचा अपव्यय होत आहे. मॅन्युअल तपासणीनंतर पुन्हा पॅकिंग करावी लागते. त्यासाठी सुद्धा अतिरिक्त वेळ लागतो. खासगी व एअर इंडियाच्या मशीन बंद असताना एमआयएलच्या मशीनद्वारे तपासणी केली जात आहे. परंतु त्यासाठी एमआयएलसुद्धा चौपट शुल्क वसूली करीत असल्याची माहिती पुढे आली आहे.
एअर इंडियाच्या मशीनवर अतिरिक्त भार
एका खासगी एअरलाईन्सच्या मशीनमध्ये बिघाड झाल्यानंतर त्या कंपनीने एअर इंडियाच्या मशीनची मदत घेतली. त्यामुळे एअर इंडियाच्या मशीनवर अतिरिक्त भार पडला असून, आता ती सुद्धा बंद पडली आहे. माहिती सूत्रानुसार एअर इंडियाची कार्गो स्कॅनिंग मशीन फार जुनी आहे. त्यामुळे येथे नवीन मशीनची गरज आहे. विशेष म्हणजे, वर्षभरापूर्वी येथील कार्गो कार्यालयात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. त्यानंतर येथील वायरिंगच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले. तसेच राष्ट्रपतींच्या विमानामुळे डुक्कर आल्यानंतर येथील जनावरे बाहेर काढण्यासाठी कवायत करण्यात आली. यावरू न एखादी घटना घडल्यानंतरच येथील प्रशासन जागे होत असल्याचा अनुभव आहे.
खासगी एअरलाईन्सची मशीन फेल!
येथील एका खासगी एअरलाईन्सची कार्गो स्कॅनिंग मशीन केवळ शोभेची वस्तू बनली आहे. माहिती सूत्रानुसार ती मशीन कम्बाईन्ड टेस्ट पीस (सीटीपी) मध्ये फेल ठरली आहे. त्यामुळे तिला परवानगी नाकारण्यात आली आहे. असे असताना विमानतळ प्रशासन संबंधित एअरलाईन्सला दुसरी मशीन लावण्याचे निर्देश का देत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Security threat to the airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.