आमदार निवासात महिला आमदारांची सुरक्षा धोक्यात; विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 09:15 PM2017-12-21T21:15:19+5:302017-12-21T21:16:46+5:30

अधिवेशनाच्या काळात शहरात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे, पण आमदार निवासात महिला आमदार असुरक्षित असल्याचा आरोप आमदार ज्योती कलानी, विद्या चव्हाण आणि दीपिका चव्हाण यांनी गुरुवारी विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना केला.

Security threat to women's legislators in MLA's residence; Complaint to the Speaker of the Assembly | आमदार निवासात महिला आमदारांची सुरक्षा धोक्यात; विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार

आमदार निवासात महिला आमदारांची सुरक्षा धोक्यात; विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार

Next
ठळक मुद्देसुरक्षा रक्षकांनी तक्रारीची दखल घेतली नाहीसाप जाणीवपूर्वक खोलीत सोडला : अबू आजमी

आॅनलाईन लोकमत
नागपूर : अधिवेशनाच्या काळात शहरात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे, पण आमदार निवासात महिला आमदार असुरक्षित असल्याचा आरोप आमदार ज्योती कलानी, विद्या चव्हाण आणि दीपिका चव्हाण यांनी गुरुवारी विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना केला.
ज्योती कलानी यांनी सांगितले की, मी आमदार निवासात प्रारंभीच्या इमारतीत खोली क्र. २१४ मध्ये निवासाला आहे. मंगळवारी माझ्यासोबत आमदार विद्या चव्हाण आणि दीपिका चव्हाण निवासाला होत्या. रात्री १२ च्या सुमारास खोलीचा दरवाजा मोठ्याने ठोठावला. दरवाजा उघडला तेव्हा दोन तरुण समोर उभे होते. काही विचारायच्या आतच त्यांनी मला प्रश्न विचारणे सुरू केले तेव्हा विद्या चव्हाण यांनी दरवाजा बंद करण्यास सांगितले. पुन्हा पहाटे ५ वाजता कुणीतरी दरवाजा मोठ्यामोठ्याने ठोठावला. त्यावेळी दरवाजा उघडला नाही. पहाटे ५ नंतर आम्हा तिघींना झोप आली नाही. या घटनेची तक्रार आमदार निवासाच्या सुरक्षा रक्षकाकडे केली. पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. सुरक्षेचा प्रश्न गुरुवारी सभागृहात मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण ते आम्हाला शक्य झाले नाही. या प्रकरणी आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे लेखी तक्रार करणार आहोत.

साप जाणीवपूर्वक खोलीत सोडला : अबू आजमी
आमदार निवासातील माझ्या खोलीत कुणीतरी साप जाणीवपूर्वक सोडल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी यांनी विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना केला. खोलीत नव्हे तर आमदार निवासाच्या परिसरात साप येणे शक्य नाही, असे सुरक्षा रक्षकांनी सांगितले. त्यानंतरही खोलीत साप येणे म्हणजे मला जीवे मारण्याचे कुणाचे कटकारस्थान आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांनी मला तातडीने घरी परत येण्यास सांगितले आहे. या गंभीर घटनेची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

 

Web Title: Security threat to women's legislators in MLA's residence; Complaint to the Speaker of the Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.