सरकारची आकडेवारी गूगलवर पहा

By admin | Published: June 14, 2017 04:42 PM2017-06-14T16:42:54+5:302017-06-14T16:42:54+5:30

सरकारची आकडेवारी पहायची असेल तर गूगलवर पहा, असे बेजबाबदार विधान केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे.अकबर यांनी केले आहे.

See government statistics on Google | सरकारची आकडेवारी गूगलवर पहा

सरकारची आकडेवारी गूगलवर पहा

Next

आॅनलाईन लोकमत
नागपूर : केंद्र शासनाची संबंधित आकडेवारी साधारणत: मंत्रालय, मंत्री किंवा अधिकारी यांच्याकडे उपलब्ध असते. मात्र सरकारची आकडेवारी पहायची असेल तर गूगलवर पहा, असे बेजबाबदार विधान केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे.अकबर यांनी केले आहे. नागपुरात बुधवारी एका पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.
पत्रपरिषदेत त्यांनी केंद्र शासनाच्या ३ वर्षांची कामगिरी मांडली. केंद्राने गरीबांसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या असून त्यामुळे अनेकांना फायदा झाला आहे, असा दावा त्यांनी केला. मात्र नेमकी ३ वर्षात गरीबी किती कमी झाली, याच्या आकड्यांबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी धक्कादायक उत्तर दिले. सरकारी आकडे तर काय आता कुठे पण दिसून येतात. आजकाल तर इंटरनेटचे युग आहे. आम्हीदेखील इंटरनेट वापरतो. गूगलवर सर्व आकडे भेटतात, असे त्यांचे उत्तर होते. बीफ बॅनवरुन देशभरात राजकारण सुरूच आहे. मात्र देशात बीफ बॅनची सुरुवात महात्मा गांधींनी केली होती, असे वक्तव्य यावेळी अकबर यांनी केले.
विजय मल्ल्याबाबतदेखील त्यांनी मौन बाळगले. वारंवार विचारणा केल्यानंतरदेखील त्यांनी माल्याच्या प्रत्यर्पणासंदर्भातील सरकारच्या प्रयत्नांबाबत उत्तर दिले नाही.

Web Title: See government statistics on Google

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.