शेतकऱ्यांच्या घरापर्यंत बियाणे-खते पोहचणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 06:42 PM2020-05-12T18:42:31+5:302020-05-12T21:48:20+5:30

सध्याची परिस्थिती लक्षात घेता, कृषी विभागाने अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी शेतकयांच्या घरापर्यंत बियाणे, खते पोहचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी त्यांनी शेतकरी गटाचे साहाय्य घेतले आहे.

 Seed-fertilizer will reach the farmer's house | शेतकऱ्यांच्या घरापर्यंत बियाणे-खते पोहचणार

शेतकऱ्यांच्या घरापर्यंत बियाणे-खते पोहचणार

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खरीप हंगामाच्या तयारीत शेतकरी लागले आहे. पण कोरोनामुळे भीतीचे सावट ग्रामीण भागात पसरले आहे. लॉकडाऊनमुळे वाहतुकीची साधने बंद आहेत. बियाणे, खते, कीटकनाशके खरेदीसाठी शहरात, तालुक्यात जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता, कृषी विभागाने अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी शेतकयांच्या घरापर्यंत बियाणे, खते पोहचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी त्यांनी शेतकरी गटाचे साहाय्य घेतले आहे.
कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन संस्था ‘आत्मा’अंतर्गत मोठ्या प्रमाणात शेतकरी गटांची नोंदणी करण्यात आली आहे. हे शेतकरी गट सध्या कृषी विभागाला तसेच प्रशासनाला साहाय्य करीत आहे. कोरोनाची भीती शहराबरोबरच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात आहे. ग्रामीण जनतेने गावाचे रस्तेसुद्धा बंद केले आहेत. बाहेरून कुणी गावात येऊ नये आणि गावातील कुणी बाहेर जाऊ नये, याची काळजी घेतली जात आहे. अशा परिस्थितीमध्ये सध्या खरीप हंगामाच्या कामांना सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीचे काम सुरू केले आहे. बियाणे, खते, कीटकनाशकांची खरेदी काही शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. पण त्यासाठी शहरात अथवा तालुक्यात जाऊन कृषी केंद्रातून ही खरेदी करायची आहे. दरम्यान, शेती साहित्य खरेदी करताना गर्दी होऊ नये, असा प्रयत्न कृषी विभागाने केला आहे. शेतकरी गट तसेच शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत शेतकरी बांधवांना त्यांच्या बांधावर कृषी निविष्ठा पुरवठा करण्याकरिता नावीन्यपूर्ण संकल्पना राबविण्यासाठी जिल्ह्यात एकूण २०१ गटांनी नोंदणी केलेली आहे. या गटांकडे शेतकऱ्यांनी लागणारे बियाणे, खते, कीटकनाशकांची मागणी नोंदवायची आहे. गटामार्फत कृषी केंद्रात जाऊन आवश्यक आणि योग्य दरामध्ये कृषी साहित्य खरेदी करण्यात येत आहे. गटाने खरेदी केलेले साहित्य शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहचवून देण्यात येत आहे.
त्यापैकी १७७ शेतकरी गटांकडे ३,१४२ शेतकऱ्यांनी ७००४ मेट्रिक टन खतपुरवठा करण्याकरिता मागणी नोंदवलेली आहे. आतापर्यंत २५ शेतकरी गटांनी ४०४ शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार ३९९ मेट्रिक टन खतांचा पुरवठा केला आहे.

गटाकडे मागणी नोंदणी केल्यानंतर आम्ही कृषी केंद्राशी चर्चा घडवून आणतो. गटामार्फत कृषी केंद्रात जाऊन बियाणे खरेदी केली जाते. यामुळे गर्दी टाळता येते. वेळेत आणि पाहिजे तो माल मिळतो. शिवाय वाहतुकीचा खर्च कमी येतो.

संजय वाकडे, तालुका कृषी अधिकारी

Web Title:  Seed-fertilizer will reach the farmer's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.