मूळकुज, खाेडकीड प्रादुर्भाव टाळण्यासाठी बीज प्रक्रिया आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:11 AM2021-06-16T04:11:36+5:302021-06-16T04:11:36+5:30

राम वाघमारे लाेकमत न्यूज नेटवर्क नांद : समाधानकारक पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांनी साेयाबीनच्या पेरणीला सुरुवात केली आहे. उन्हाळ्यात काेसळणाऱ्या पावसामुळे ...

Seed processing is essential to prevent the emergence of root rot | मूळकुज, खाेडकीड प्रादुर्भाव टाळण्यासाठी बीज प्रक्रिया आवश्यक

मूळकुज, खाेडकीड प्रादुर्भाव टाळण्यासाठी बीज प्रक्रिया आवश्यक

Next

राम वाघमारे

लाेकमत न्यूज नेटवर्क

नांद : समाधानकारक पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांनी साेयाबीनच्या पेरणीला सुरुवात केली आहे. उन्हाळ्यात काेसळणाऱ्या पावसामुळे जमिनीत माेठ्या प्रमाणात घातक बुरशी तयार हाेत असल्याने साेयाबीनच्या पिकावर मूळकुज व खाेडकिडीचा प्रादुर्भाव हाेण्याचे व त्यातून पिकाचे नुकसान हाेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पेरणीपूर्वी साेयाबीन बियाण्यांवर बीज प्रक्रिया करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

गेल्या हंगामात साेयाबीन कापणीच्या वेळी परतीचा पाऊस आल्याने साेयाबीन खराब झाले. तत्पूर्वी मुळकूज, खाेडकीड व येल्लाे माेझॅकचाही प्रादुर्भाव झाला हाेता. त्यामुळे यंदाच्या हंगामातील साेयाबीन बियाण्यांच्या उगवण क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याच कारणामुळे बाजारात साेयाबीन बियाण्यांचा तुटवडाही निर्माण झाला असून, किमती वाढल्या आहेत.

कंपन्या साेयाबीन बियाण्यांच्या बॅगसाेबत थायरम नामक औषध देतात. मात्र, शेतकरी थायरम बियाण्याला लावत नाही. त्यामुळे बियाणे अंकुरताच किडींना बळी पडतात. उन्हाळ्यात जमीन पुरेशी तापत नसल्याने तसेच अवकाळी पाऊस येत असल्याने जमिनीत माेठ्या प्रमाणात शत्रू बुरशी तयार हाेते आणि ती पिकांच्या मुळावर येत असल्याने उत्पादनात घट हाेते. या बुरशीमुळे साेयाबीनच्या पिकावर फलधारणेपूर्वी मुळकूज व खाेडकिडीचा प्रादुर्भाव हाेताे. पीक अकाली सुकायला सुरुवात हाेत असल्याने उत्पादनात घट हाेत असल्याची माहिती कीटक शास्त्रज्ञ डाॅ. प्रदीप दवणे यांनी दिली. त्यामुळे पेरणीपूर्वी या राेगांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

तुटवड्यामुळे साेयाबीन बियाण्यांच्या किमतीही वाढल्या आहेत. त्यातच उगवण क्षमतेबाबत मनात शंका निर्माण हाेत असल्याची प्रतिक्रिया विद्याधर वाकडे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी व्यक्त केली. दुसरीकडे, उगवण क्षमता तपासून साेयाबीनची याेग्य पद्धतीने व समाधानकारक पाऊस काेसळल्यावर पेरणी करावी, अशी सूचनाही तालुका कृषी अधिकारी राजेश जाराेंडे यांनी केली आहे.

....

अशी करावी बीज प्रक्रिया

सोयाबीन बियाणे ताडपत्रीवर टाकून प्रति एक किलो बियाण्याला पाच ग्रॅमप्रमाणे ३० किलाे बियाण्याला १५० ग्रॅम बुरशीनाशकाचे द्रावण लावावे. साेयाबीनचे ‘सीड काेट’ पातळ व नाजूक असल्याने द्रावण हळूवार लावावे. द्रावण लावल्यानंतर बियाणे ओलसर हाेत असल्याने ते किमान एक तास सावलीत सुकवावे. त्यानंतर त्या बियाण्याचा पेरणीसाठी वापर करावा. ही प्रक्रिया पेरणीपूर्वी किमान एक तास आधी करावी. बीज प्रक्रियेमुळे बियाण्याची उगवण क्षमता तसेच कीड व राेगप्रतिकारशक्ती वाढते.

...

मी दरवर्षी बीज प्रक्रिया करून खरीपात साेयाबीन व रबीत हरभऱ्याची पेरणी करताे. यावर्षी १५ एकरात साेयाबीनची पेरणी केली असून, संपूर्ण बियाण्याला बीज प्रक्रिया केली आहे. बीज प्रक्रियेमुळे मूळकुज व खाेडकिडीचा प्रादुर्भाव माझ्या शेतातील साेयाबीन व हरभऱ्याच्या पिकावर अद्याप झाला नाही. शिवाय, उत्पादनातही वाढ हाेते. माझ्या शेजारचे काही शेतकरी चार वर्षांपासून हा प्रयाेग करीत आहेत.

- विद्याधर वाकडे, शेतकरी,

पांजरेपार, ता. भिवापूर.

...

खोडमाशीच्या व्यवस्थापनासाठी थायमेथोक्झाम १० मिली प्रती किलो बियाण्यास चोळून पेरणी करावी. बुंधा सड किंवा रोपावस्थेतील रोगाच्या व्यवस्थापनासाठी कार्बोक्झिम व थायरम या मिश्र बुरशीनाशकाची तीन ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बीज प्रक्रिया करावी. सड रोगाच्या व्यवस्थापनासाठी थायोफेनेट मिथाईल व पायराक्लोस्टोबिन एफएस या संयुक्त बुरशीनाशक बियाणे लावून पेरणी करावी. ही औषधे सोयाबीन बियाण्यांना हाताने हळूवार चोळावे.

- राजेश जारोंडे,

तालुका कृषी अधिकारी, भिवापूर.

===Photopath===

140621\5105img_20210614_094537.jpg

===Caption===

सोयाबीन बीजं प्रक्रिया फोटो

Web Title: Seed processing is essential to prevent the emergence of root rot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.