लिंगा-लाडई येथे सीडबाॅल प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:08 AM2021-06-26T04:08:22+5:302021-06-26T04:08:22+5:30
कळमेश्वर : लिंगा-लाडई (ता. कळमेश्वर) येथील सावित्रीबाई फुले बचतगट, नागपूर येथील यशवंत बालाजी बहुउद्देशीय सामाजिक संस्था, सुसुंद्र (ता. कळमेश्वर) ...
कळमेश्वर : लिंगा-लाडई (ता. कळमेश्वर) येथील सावित्रीबाई फुले बचतगट, नागपूर येथील यशवंत बालाजी बहुउद्देशीय सामाजिक संस्था, सुसुंद्र (ता. कळमेश्वर) येथील प्रगती क्रीडा व सांस्कृतिक सेवा संस्था, पारशिवनी येथील ज्ञानविकास कला प्रतिष्ठान व वनविभागाच्या कळमेश्वर वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या संयुक्त विद्यमानाने लिंगा लाडई येथे वडसावित्रीनिमित्त (गुरुवार, दि. २४) महिलांसाठी सीडबॉल प्रशिक्षणाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी महिलांनी सीडबाॅल तयार करण्यासाेबत वड व पिंपळाच्या राेपट्यांची लागवड करीत वृक्षाराेपण केले.
शिवाय, तयार केलेले सीडबाॅल त्यांनी लिंगा-लाडई परिसरातील जंगलालगतच्या ओसाड जागेवर टाकले. यावेळी निसर्ग संरक्षणाचा संदेश देत जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाला तालुका अभियान व्यवस्थापक प्रशांत धोटे, वनपरिक्षेत्र अधिकारी अर्चना नौकरकर, शुभांगी वैद्य, समुपदेशक गीता दळवी, मेघा भिंगारे, कल्पना काळबांडे, तारा बुरडे, संगीता फलके, सरपंच पल्लवी हत्ती, सुनंदा अण्णाजी राऊत, सुनंदा अशोक राऊत, चंद्रकला राऊत, रंजना भुजाडे, लक्ष्मी पलांदुरकर, शीतल पाल, कांचन सलाम, पुष्पा तागडे, प्रमिला मोरपाची, नमिता मेश्राम, प्रियंका फलके, सृष्टी पाल यांच्यासह महिला उपस्थित हाेत्या.