भारतीय संस्कृतीची झलक बघून भारावलो : ग्योम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 10:20 PM2018-10-16T22:20:12+5:302018-10-16T22:26:26+5:30
भारतीय सण, संस्कृतीबद्दल वाचले होते. पण पहिल्यांदा भारतीय सणांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. सर्व लोक एकत्र येऊन आनंदाने सण साजरा करीत असल्याचे बघून आनंद झाला. देवीचे मनोभावे पूजन, दर्शनासाठी जमलेला मोठा जनसमुदाय हे केवळ भारतातच बघायला मिळते, हे सर्व बघून मी भारावलो आहे, अशी भावना परमार्ड रिकॉर्ड इंडिया लि. चे मॅनेजिंग डायरेक्टर ‘ग्योम’ यांनी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय सण, संस्कृतीबद्दल वाचले होते. पण पहिल्यांदा भारतीय सणांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. सर्व लोक एकत्र येऊन आनंदाने सण साजरा करीत असल्याचे बघून आनंद झाला. देवीचे मनोभावे पूजन, दर्शनासाठी जमलेला मोठा जनसमुदाय हे केवळ भारतातच बघायला मिळते, हे सर्व बघून मी भारावलो आहे, अशी भावना परमार्ड रिकॉर्ड इंडिया लि. चे मॅनेजिंग डायरेक्टर ‘ग्योम’ यांनी व्यक्त केली.
लोकमत व राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाद्वारे आयोजित नागपूर दुर्गा महोत्सवात मातेच्या दर्शनासाठी ते आले असता, त्यांनी लोकांमध्ये असलेली ऊर्जा, उत्साह आणि भव्य आयोजन बघून आनंद व्यक्त केला. पॅरिसहून आलेले ग्योम यांनी एक दिवस नागपुरात घालविला. सायंकाळी त्यांनी नागपूर दुर्गा महोत्सवाला भेट दिली. त्यांनी दोन्ही हात जोडून मातेचे दर्शन घेतले. मंडळाचे भव्य आयोजन व येथे जमलेला जनसमुदाय बघून आकर्षित झाले. भारतीयांच्या मातेबद्दलच्या असलेल्या भावना, येथून मिळणारी सकारात्मक ऊर्जा, भाविकांच्या चेहऱ्यावरील आनंद, भाव बघितल्यानंतर आश्चर्य व्यक्त केले. थोड्या वेळासाठी आलेले ग्योम यांनी मंडळात आयोजित राष्ट्रीय एकात्मतेवरील फॅशन शोचा आनंद लुटला. अगदी कार्यक्रम संपेपर्यंत ते उपस्थित राहिले. लोकमत समूहाबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की, वृत्तपत्राबद्दल मला माहिती आहे. पण एक वृत्तपत्र अशा महोत्सवात सहभागी होऊन आपल्या संस्कृतीला चालना देण्याचे कर्तव्य पार पाडत असल्याचे ते म्हणाले. आपल्या संस्कृतीबद्दल भारतीयांच्या असलेल्या प्रगाढ श्रद्धेला त्यांनी नमन केले.