माऊझरसह जिवंत काडतूस जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:41 AM2021-02-05T04:41:01+5:302021-02-05T04:41:01+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा : जुगार चालविणाऱ्याच्या खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आराेपींपैकी एकाच्या घराची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : जुगार चालविणाऱ्याच्या खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आराेपींपैकी एकाच्या घराची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने झडती घेत त्याच्या घरातून एक माऊझर व दाेन जिवंत काडतूस आढळून आल्याने पाेलिसांनी ते जप्त केले. याची एकूण किंमत ३४ हजार रुपये असल्याचे पाेलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. ही कारवाई खापरखेडा (ता. सावनेर) येथे बुधवारी (दि. २७) सायंकाळी करण्यात आली.
प्रशांत घाेडेस्वार, रा. खापरखेडा नामक जुगार चालकाची खापरखेडा येथे बुधवारी (दि. २०) रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास गळा चिरून हत्या करण्यात आली. त्याच्या खून प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सहा आराेपींना अटक केली. आराेपींमध्ये आनंंद शिंदे (३०, रा. खापरखेडा) याचाही समावेश आहे. सर्व आराेपी अजूनही पाेलिसांच्या ताब्यात आहेत. आनंद हा प्रशांतचा जवळचा मित्र हाेय. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी सायंकाळी आनंदच्या घराची झडती घेतली.
यात त्यांना आनंदच्या घरातील बाथरूमवर असलेल्या अडगळीत माऊझर आणि त्याच्या मॅग्झीनमध्ये दाेन जिवंत काडतूस आढळून आले. त्यामुळे पाेलिसांनी ते जप्त केले. देेशी बनावटीच्या या माऊझर किमत ३० हजार रुपये व काडतुसांची किंमत ४ हजार रुपये असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई उपविभागीय पाेलीस अधिकारी मुख्तार बागवान, पाेलीस उपनिरीक्षक प्रीतम निमगडे, हवालदार उमेश ठाकरे, शिपाई वीरेंद्र नरड, राजू भोयर, नुमान शेख, प्रीती अहीरकर, स्वाती नागदिवे यांच्या पथकाने केली.