नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या ६८ अनुकंपाधारकाची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:07 AM2020-12-08T04:07:32+5:302020-12-08T04:07:32+5:30
नागपूर : नागपूर जिल्हा परिषद प्रशासनाने ६८ अनुकंपा उमेदवारांची प्रतीक्षा संपविली आहे. प्रतीक्षा यादीनुसार व उमेदवारांच्या शैक्षणिक व तांत्रिक ...
नागपूर : नागपूर जिल्हा परिषद प्रशासनाने ६८ अनुकंपा उमेदवारांची प्रतीक्षा संपविली आहे. प्रतीक्षा यादीनुसार व उमेदवारांच्या शैक्षणिक व तांत्रिक पात्रतेनुसार ६८ उमेदवारांना जिल्हा परिषदेने नियुक्त्या दिल्या.
यात कनिष्ठ सहा. (लिपिक) ३१ पदे, वरिष्ठ सहा. (लिपिक) ४, कनिष्ठ सहायक (लेखा) ५, वरिष्ठ सहा. लेखा - २ पदे, कंत्राटी ग्रामसेवक १३, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक ५, अंगणवाडी पर्यवेक्षिका ३, आरोग्यसेवक ३ व औषध निर्माण अधिकारी २ पदावर नियुक्त्या देण्यात आल्या. ही निवड उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनिहाय करण्यात आली. अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीसंदर्भात पारदर्शकता राहण्याच्या दृष्टीने निवड यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर टाकण्यात आली होती. तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या नोटीस बोर्डवरसुद्धा प्रसिद्ध केली होती. पदस्थापना देण्याकरिता जि.प. सभागृहात प्रक्रिया राबविण्यात आली होती. या प्रक्रियेच्या ठिकाणी सर्व उमेदवारांना एकत्रितरीत्या नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात आले असल्याचे जि.प. अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी सांगितले. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या पुढाकाराने अनुकंपाधारकांच्या नोकरीचा बॅकलॉग मोठ्या प्रमाणात भरून काढण्यात जि.प.ला यश आले आहे.