नागपूर जिल्ह्यातून ५६९९ बालकांची आरटीईत प्रवेशाकरिता निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:07 AM2019-04-10T00:07:33+5:302019-04-10T00:10:33+5:30

राईट टू एज्युकेशन (आरटीई) च्या २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी झालेल्या लॉटरीच्या सोडतीत नागपूर जिल्ह्यातून ५६९९ बालकांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. जिल्ह्यात आरटीईसाठी आरक्षित ६७५ शाळांमध्ये ७२०४ जागा होत्या. त्यापैकी ८० टक्के जागावर पहिल्याच लॉटरीत निवड झाली आहे.

Selection for admission of 5699 children in RTE from Nagpur district | नागपूर जिल्ह्यातून ५६९९ बालकांची आरटीईत प्रवेशाकरिता निवड

नागपूर जिल्ह्यातून ५६९९ बालकांची आरटीईत प्रवेशाकरिता निवड

googlenewsNext
ठळक मुद्देपहिल्या वर्गात ५४६३, केजी वनमध्ये ७७ व नर्सरीत १५९ बालकांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राईट टू एज्युकेशन (आरटीई) च्या २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी झालेल्या लॉटरीच्या सोडतीत नागपूर जिल्ह्यातून ५६९९ बालकांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. जिल्ह्यात आरटीईसाठी आरक्षित ६७५ शाळांमध्ये ७२०४ जागा होत्या. त्यापैकी ८० टक्के जागावर पहिल्याच लॉटरीत निवड झाली आहे.
आरटीईमध्ये यावर्षी २६ हजारावर अर्ज आले होते. यंदा पहिल्यांदा पुणे येथून लॉटरीची सोडत काढण्यात आली. जिल्ह्यात एकूण ७२०४ जागांपैकी पहिल्या वर्गासाठी ६८७३, केजी १ साठी ७७ व नर्सरीसाठी २५४ जागा आरक्षित करण्यात आला होता. सर्वाधिक ३३७० जागा नागपूर शहरात आरक्षित होत्या. नागपूर ग्रामीणमध्ये १२१६ जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या. पहिल्याच सोडतीत ८० टक्के बालकांची निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाल्यानंतर उर्वरित जागेसाठी दुसरी सोडत काढण्यात येणार आहे. प्रवेशासंदर्भात अद्यापही वेळापत्रक आलेले नाही. मात्र निवड झाल्यासंदर्भातील मॅसेज पालकांच्या मोबाईलवर पाठविण्यात आले असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली आहे.

 

Web Title: Selection for admission of 5699 children in RTE from Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.