निवड, नियुक्ती, सूयश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:07 AM2021-07-26T04:07:30+5:302021-07-26T04:07:30+5:30
नागपूर : एम. एससी. (फॉरेन्सिक सायन्स) अभ्यासक्रमामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थिनींमधून सर्वाधिक गुण मिळवल्यामुळे समीक्षा लांडगे हिला प्रभा तुळशीदास ...
नागपूर : एम. एससी. (फॉरेन्सिक सायन्स) अभ्यासक्रमामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थिनींमधून सर्वाधिक गुण मिळवल्यामुळे समीक्षा लांडगे हिला प्रभा तुळशीदास गेडाम सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले. ती इन्स्टिट्युट ऑफ फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी आहे. तिने या अभ्यासक्रमातील सर्व सेमिस्टर पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण केले.
-----
रोशनी शेरेकर
नागपूर : ॲड. रोशनी शेरेकर-गिजरे यांना पुणे येथील नॅशनल अकॅडेमी ऑफ आर्ट एज्युकेशनच्या वतीने नॅशनल वुमेन्स एक्सलन्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. स्मृतिचिन्ह, पदक व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
-----------
उज्ज्वला मोकदम
नागपूर : उज्ज्वला मोकदम यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून पीएच. डी. पदवी मिळविली. ‘वीटाभट्टी कामगारांच्या समस्या : एक समाजशास्त्र अध्ययन’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. त्यांना डॉ. सुरेंद्र पवार यांनी मार्गदर्शन केले.