कमलताई व आगलावे यांची दीक्षाभूमी स्मारक समितीवर निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:12 AM2021-09-10T04:12:08+5:302021-09-10T04:12:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीची ३ सप्टेंबरला बैठक झाली होती. या बैठकीत ...

Selection of Kamaltai and Aglave on Deekshabhoomi Memorial Committee | कमलताई व आगलावे यांची दीक्षाभूमी स्मारक समितीवर निवड

कमलताई व आगलावे यांची दीक्षाभूमी स्मारक समितीवर निवड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीची ३ सप्टेंबरला बैठक झाली होती. या बैठकीत भन्ते नागदीपंकर, डॉ. कमलताई गवई, डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. चंद्रशेखर मेश्राम या चार जणांच्या नावावर चर्चा झाली. मात्र, डॉ. कमलताई वगळता इतर नावावर एकमत न झाल्याने त्या दिवशी झालेली बैठक वादळी ठरली होती. मात्र, पाच दिवसांनंतर याच चार जणांची नियुक्ती स्मारक समितीने केली असल्याची चर्चा आहे. स्मारक समितीच्या सदस्यांनी मात्र यावर काहीही बोलण्यास नकार दिला. सूत्रानुसार समितीमध्ये सदस्यांच्या नावावरून अजूनही एकमत नसल्याचे सांगितले जाते.

स्मारक समितीच्या मागील साठ वर्षांच्या इतिहासात प्रथमच सहा तास मॅरेथॉन बैठक सुरू होती. सदस्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकले नसले तरी, ही नावे ठरवली आहेत. याच नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे समितीतील एका गटाचे म्हणणे आहे. या नावांवरून समितीमध्ये थेट दोन गट पडल्याची जोरदार चर्चा आहे. दादासाहेब गवई यांच्या निधनानंतर प्रथमच भन्ते आर्य नागार्जुन सुरई ससाई यांची निवड झाली. यानंतर मात्र स्मारक समितीच्या बैठकीच होत नसल्याचे दिसून आले. सध्या दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीमधील अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई, कार्यवाह सुधीर फुलझेले, डॉ. राजेंद्र गवई, विलास गजघाटे, एन.आर. सुटे ही प्रमुख नावे असून, यांच्यात एकवाक्यता नसल्याचे शुक्रवारी झालेल्या बैठकीतून दिसून आल्याची चर्चा रंगली होती. दुपारी २ वाजता बैठकीला सुरुवात झाली होती. रात्री ८ वाजून १५ मिनिटांनी संपली. गवई आणि फुलझेले यांनी बैठकीतून बाहेर जाऊन चर्चा केली होती. भन्ते नागदीपंकर, डॉ. कमलताई गवई, डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. चंद्रशेखर मेश्राम या चार जणांच्या निवडीसंदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी समितीचे कार्यवाह डॉ. सुधीर फुलझेले यांच्याशी संपर्क साधला; परंतु संपर्क होऊ शकला नाही. नावावर एकमत झाले नसल्यानेच घोषणा झाली नाही, अशीही चर्चा आहे.

Web Title: Selection of Kamaltai and Aglave on Deekshabhoomi Memorial Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.