सीएटच्या रोजगार मेळाव्यात ९ विद्यार्थ्यांची निवड
By आनंद डेकाटे | Published: October 12, 2023 02:51 PM2023-10-12T14:51:16+5:302023-10-12T14:51:35+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ रोजगार व प्रशिक्षण विभागाचे आयोजन
नागपूर : टायर उत्पादन क्षेत्रातील नामांकित अशा सीएट कंपनीचा रोजगार मेळावा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सभागृहात पार पडला. रोजगार व प्रशिक्षण विभागाच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्यात सिएट कंपनीमध्ये ९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
सिएट कंपनीकडून आयोजित रोजगार मेळाव्यासाठी एकूण १४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. कंपनीकडून असोसिएट ट्रेनिंग या पदासाठी घेण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात ४९ विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली. असोसिएट ट्रेनिंग या पदासाठी २०२२ आणि २३ मधील बीएससी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) विषय घेऊन उत्तीर्ण विद्यार्थी पात्र होते. पुरुषांसाठी कमीत कमी १५२.५ सेमी उंची तर महिलांकरिता १५२.५ सेमी उंची आवश्यक होती. त्याचप्रमाणे पुरुषांचे कमीत कमी वजन ५० किलो ग्रॅम तर महिलांकरिता ४५ किलो ग्रॅम वजन असणे आवश्यक होते. त्याचप्रमाणे १८ वर्ष पूर्ण तर २४ वर्षाखालील वय आवश्यक होते.