अजीम प्रेमजी फाउंडेशन करणार विद्यापीठातील विद्यार्थ्यांची निवड, गणित विभागात कॅम्पस इंटरव्यू

By आनंद डेकाटे | Published: April 24, 2023 04:05 PM2023-04-24T16:05:39+5:302023-04-24T16:11:23+5:30

'असोसिएट' या पदाकरिता फाउंडेशनकडून पूर्वी लिखित परीक्षा घेण्यात आली.

Selection of university students by Azim Premji Foundation, Campus Interview in Mathematics Department | अजीम प्रेमजी फाउंडेशन करणार विद्यापीठातील विद्यार्थ्यांची निवड, गणित विभागात कॅम्पस इंटरव्यू

अजीम प्रेमजी फाउंडेशन करणार विद्यापीठातील विद्यार्थ्यांची निवड, गणित विभागात कॅम्पस इंटरव्यू

googlenewsNext

नागपूर :राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या गणित विभागात कॅम्पस इंटरव्यूचे आयोजन करण्यात आले आहे. अजीम प्रेमजी फाउंडेशनकडून गणित विभागातील रामानुजन सभागृहात सोमवारपासून मुलाखतीला सुरुवात झाली. उद्या मंगळवारी सुद्धा मुलाखती घेण्यात येतील. यातून विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे.

विद्यापीठाच्या रोजगार व प्रशिक्षण सेलच्या वतीने विविध कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्यू आयोजित केले जात आहे. विज्ञान व तंत्रज्ञान आणि मानव्य विज्ञान विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी प्राप्त व्हावी म्हणून या कॅम्पस इंटरव्यूचे आयोजन करण्यात आले. अजीम प्रेमजी फाउंडेशन विद्यापीठातील या दोन्ही विद्या शाखांमधून असोसिएट या पदाकरिता विद्यार्थ्यांची निवड करणार आहे. विद्यार्थ्यांच्या मुलाखती अजीम प्रेमजी फाउंडेशनचे रिक्रुटमेंट (स्टेट) अविनाश झाडे, जिल्हा संस्था लीडर प्रियंक श्रीवास्तव, ज्वाय जयंत चौधरी यांच्याकडून घेतल्या जात आहे.

'असोसिएट' या पदाकरिता फाउंडेशनकडून पूर्वी लिखित परीक्षा घेण्यात आली. लिखित परीक्षेकरिता ५९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. लिखित परीक्षा नंतर २२ विद्यार्थी मुलाखतीकरिता पात्र ठरले आहे. या २२ विद्यार्थ्यांच्या दोन दिवस मुलाखती घेतल्या जाणार आहे. त्यानंतर असोसिएट या पदाकरिता विद्यार्थ्यांची निवड केली जाईल.

Web Title: Selection of university students by Azim Premji Foundation, Campus Interview in Mathematics Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.