आंतर विद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेत नागपूर विद्यापीठाच्या महिला बॉक्सिंग संघाची निवड
By Shrimant Mane | Updated: November 29, 2024 18:56 IST2024-11-29T18:53:24+5:302024-11-29T18:56:23+5:30
Nagpur : अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत होणार सहभागी

Selection of Women's Boxing Team of Nagpur University in Inter University Boxing Tournament
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महिलाबॉक्सिंग संघाची घोषणा क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ संचालक डॉ. विशाखा जोशी यांनी केली आहे. महिलाबॉक्सिंग संघ भठिंडा येथील गुरु काशी विद्यापीठ येथे १८ डिसेंबर ते २४ डिसेंबर २०२४ दरम्यान आयोजित अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेत सहभागी होणार आहे.
महिला बॉक्सिंग संघामध्ये एस. के. पी. महाविद्यालय कामठी येथील संध्या शरनागत (४५ ते ४८ वजन गट), ज्योतिबा शारीरिक शिक्षण महाविद्यालय नागपूर येथील वंशिका (५० ते ५२ वजन गट), हिस्लाॅप महाविद्यालय नागपूर येथील अंजली पिल्लीवार (५२ ते ५४ वजन गट), ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय नागपूर येथील हेमांती भुजाडे (५४ ते ५७ वजन गट), सीपी अँड बेरार महाविद्यालय नागपूर येथील श्रुती झाडे (५७ ते ६० वजन गट), राणी अग्निहोत्री एसएस महिला महाविद्यालय वर्धा येथील तनिषा (६० ते ६३ वजन गट), एस एन मोर महाविद्यालय तुमसर येथील युक्तीका गोडेफोडे (६३ ते ६६ वजन गट), शाक्य महाविद्यालय नारा येथील मनीषा निमजे (६६ ते ७० वजन गट), श्री एम. एम. विज्ञान महाविद्यालय नागपूर येथील वैदेही डिबे (७२ ते ७५ वजन गट), एस. एन. मोर महाविद्यालय तुमसर येथील शिबा धांडेकर (७५ ते ८१ वजन गट), ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय नागपूर येथील यशश्री साखरे (८१ वरील वजन गट), आर. एस. बिडकर महाविद्यालय हिंगणघाट येथील अनुराधा अनुसे (६० ते ६३ वजन गट) व एस. के. पी. महाविद्यालय कामठी येथील सिमरन धुर्वे (७२ ते ७५ वजन गट) यांचा समावेश आहे. निवड झालेल्या खेळाडूंना माननीय प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. राजेंद्र काकडे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, क्रीडा व शारीरिक शिक्षक मंडळ प्रभारी संचालक डॉ. विशाखा जोशी व मंडळाच्या सर्व सदस्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.