मनपाच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी सहा शिक्षकांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:11 AM2021-09-05T04:11:59+5:302021-09-05T04:11:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर महापालिकेच्या शाळांमध्ये उत्कृष्ट सेवाकार्य करणाऱ्या सहा शिक्षकांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महापालिकेच्या शाळांमध्ये उत्कृष्ट सेवाकार्य करणाऱ्या सहा शिक्षकांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यात सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळेच्या शिक्षिका कल्पना माळवे, वाठोडा मराठी उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक ईश्वर धुर्वे, सदर उर्दू उच्च प्राथमिक शाळेच्या शिक्षिका शाहिन सय्यद, बॅ. शेषराव वानखेडे विद्यनिकेतनचे शिक्षक संदीप अभ्यंकर, सानेगुरुजी उर्दू माध्यमिक शाळेचे शिक्षक अब्दुल सलीम अब्दुल रहीम आणि ताजाबाद उर्दू माध्यमिक शाळेचे शिक्षक काजी नुरुल लतीफ आदींचा समावेश आहे.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त ९ सप्टेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करणार असल्याची माहिती शिक्षण सभापती दिलीप दिवे यांनी दिली.