विमानतळावर `सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म`
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:08 AM2020-12-29T04:08:12+5:302020-12-29T04:08:12+5:30
विदेशातून आलेल्या प्रवाशांवर नजर नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर या आठवड्यात पुन्हा प्रवाशांकडून सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरणे ...
विदेशातून आलेल्या प्रवाशांवर नजर
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर या आठवड्यात पुन्हा प्रवाशांकडून सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरणे सुरू झाले आहे. या फॉर्मच्या माध्यमातून प्रवाशांना त्यांनी विदेशातून प्रवास केला आहे काय, याची माहिती भरणे सक्तीचे केले आहे.
नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कतार व शारजाहसाठी जाणारी आंतरराष्ट्रीय विमाने बंद आहेत. परंतु काही देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर खबरदारी म्हणून स्थानिक प्रशासनाने सेल्फ डिक्लेरेशनची व्यवस्था केली आहे. नागपुरातून इतर विमानतळावर गेल्यानंतर अनेक प्रवासी विदेशात प्रवास करतात. उल्लेखनीय म्हणजे संयुक्त अरब अमिरात, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड व युरोपातून आलेल्या प्रवाशांवर मागील १४ दिवसापासून विशेष लक्ष पुरविण्यात येत आहे. सध्या नागपूर विमानतळावरून दररोज ५,५०० प्रवासी ये-जा करीत आहेत. परंतु पूर्वीसारखे आता प्रवाशांच्या हातावर क्वारंटाईनचे शिक्के लावण्यात येत नाहीत.
...........