सेल्फी विथ ‘देव’बाप्पा :

By admin | Published: September 29, 2015 04:10 AM2015-09-29T04:10:27+5:302015-09-29T04:10:27+5:30

स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश सरकारने सार्वजनिक सभा आणि लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी घातली

Selfie With 'Dev' Bappa: | सेल्फी विथ ‘देव’बाप्पा :

सेल्फी विथ ‘देव’बाप्पा :

Next

सेल्फी विथ ‘देव’बाप्पा : स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश सरकारने सार्वजनिक सभा आणि लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी घातली होती आणि जनजागृतीसाठी लोकांना एकत्र आणणे गरजेचे होते. याच काळात समाज एकजूट होण्यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची संकल्पना मांडली. बुद्धीची देवता गणपती ही सर्व स्तरातील लोकांना प्रिय आणि पूजनीय असल्यामुळे या कार्यासाठी त्यांनी गणेशाची निवड केली. त्याचवेळी विसर्जन मिरवणूक काढण्याचीही संकल्पना मांडली. यानिमित्ताने स्वातंत्र्य आणि स्वतंत्र राष्ट्र म्हणजे काय, हे दाखवून देण्याचा टिळकांना उपाय सापडला. धरमपेठेतील गणेशोत्सव मंडळाने सोमवारी हीच संकल्पना समोर ठेवून वेगवेगळ्या वेशभूषेद्वारे या संकल्पनेला बळ दिले. राम-लक्ष्मण, सीता, दुर्गामाता अशा विविध देवदेवतांच्या वेशभूषांद्वारे विसर्जन मिरवणुकीत रंग भरला. त्यावेळी ब्रिटिशाच्या वेशभूषेतील या भक्ताला ‘देव’गणांसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.

Web Title: Selfie With 'Dev' Bappa:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.