रुग्ण, नातेवाइकांसाठी ‘एम्स’मध्ये ‘सेल्फी पॉइंट 

By सुमेध वाघमार | Published: January 8, 2024 07:15 PM2024-01-08T19:15:53+5:302024-01-08T19:16:15+5:30

तुटलेल्या वॉश बेसिनमध्ये लावले शोभिवंत झाडे.

Selfie Point at AIIMS for patients relatives | रुग्ण, नातेवाइकांसाठी ‘एम्स’मध्ये ‘सेल्फी पॉइंट 

रुग्ण, नातेवाइकांसाठी ‘एम्स’मध्ये ‘सेल्फी पॉइंट 

 नागपूर:  आजाराची चिंता, दुखणे, औषधांचा दर्प यात नाऊमेद होणाऱ्या मनाला एक उमेद मिळावी यासाठी  अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी एक अभिनव संकल्पना साकारली. रुग्णालयातीलच टाकाऊ वस्तूपासून ‘सेल्फी पार्इंट’ तयार केले. सध्या रुग्ण आणि नातेवाईकांसाठी हे एक आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.

‘एम्स’मधील बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) व आंतररुग्ण विभागात (आयपीडी) रुग्णांची संख्या वाढली आहे. परिणामी, रुग्णालयातून निघणाºया कचºयाचे प्रमाणही वाढले आहे. यातील ज्या टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्या, वाहनांचे निकामी टायर, प्लास्टिक कचºयाचा योग्य वापर करण्याची कल्पना डॉ. श्रीगिरीवार यांना सूचली. त्यांनी या कचºयातून सौंदर्य फुलवण्यासाठी  प्रयत्नाला सुरूवात केली. त्यांनी टाकाऊ प्लास्टिक बाटल्या पासून ते न वापरलेले परंतु खराब झालेल्या पीपीई किट, औषध, रसायनांचे डबे, तुटलेले वॉश बेसिन, टॉयलेट सीट्मध्ये शोभिवंत झाडे लावली. या सर्व झाडांसह साहित्यांना आकर्षत पद्धतीने ठेऊन त्याचा ‘एम्स’मध्ये ‘सेल्फी पॉईंट’ तयार केला. यातून नागरिकांना कचऱ्यातून कलेचा संदेश देण्यात आला. या उपक्रमात एम्सच्या डॉ. नीलम, ज्योती लाटवाल आणि चचाणे यांचेही महत्त्वाचे योगदान लाभले.

-कचऱ्याच्या पूनर्रवापरातून फुलविले सौंदर्य

‘एम्स’मध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. परिणामी, रोज निघणाºया कचºयातही वाढ झाली आहे. विशेषत: प्लास्टिकच्या कचºयाचा पूर्नवापर करण्याचा सुरूवातीपासून विचार होता. अखेर त्यात शोभीवंत झाडे लावून रुग्णालयाचा एका कोपऱ्यात सौंदर्य फु लविण्याचा निर्णय घेतला. त्या दृष्टीने प्रयत्न झाले आणी एक सामाजिक संदेश देणारा ‘सेल्फी पार्इंट’ निर्माण झाला. 
-प्रा. डॉ. मनीष श्रीगिरीवार, वैद्यकीय अधीक्षक, एम्स, नागपूर.

Web Title: Selfie Point at AIIMS for patients relatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर