भूसंपादनाचा प्रस्ताव पाठवा !

By admin | Published: May 17, 2015 02:55 AM2015-05-17T02:55:18+5:302015-05-17T02:55:18+5:30

मेट्रो रेल्वेसाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीचा प्रस्ताव शासनस्तरावर तातडीने मंजूर करण्यासाठी एकत्रितरीत्या पाठवावा.

Send Land Proposal | भूसंपादनाचा प्रस्ताव पाठवा !

भूसंपादनाचा प्रस्ताव पाठवा !

Next

नागपूर : मेट्रो रेल्वेसाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीचा प्रस्ताव शासनस्तरावर तातडीने मंजूर करण्यासाठी एकत्रितरीत्या पाठवावा. शासनाच्या जागांचे हस्तांतरण करण्यास कोणतीही अडचण येणार नाही. तोपर्यंत काम थांबवू नये, असे निर्देश मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी येथे दिले.
माती परीक्षण तीन  महिन्यात पूर्ण होणार
माती व खडक परीक्षणाचे काम अहमदाबाद येथील आनंदजीवाला टेक्निकल कन्सलटन्सीला (एटीईसी) मिळाले आहे. जवळपास १ कोटीचे हे काम आहे. कंपनीच्या निर्देशानुसार जवळपास तीन महिन्यात १५ मशीनरीद्वारे येथील परिस्थितीनुसार काम पूर्ण करण्यात येणार आहे. प्रत्येक मशीनवर चार असे दररोज ६० पेक्षा जास्त कुशल व अकुशल मजूर दिवसरात्र काम करतील. ३७० बोअर करण्यात येणार असून प्रत्येक बोअर १५ ते २० मीटर अथवा २५ मीटर खोल राहील.
कामाच्या शुभारंभाप्रसंगी नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे कार्यकारी अभियंता डी.एम. सोनवणे, ओएसडी पी.एल. कडू, महाव्यवस्थापक आनंदकुमार, उपमहाव्यवस्थापक राजू एल्कावार, ‘एटीईसी’चे संचालक मृगेश आनंदजीवाला, व्यवसाय विकास व्यवस्थापक शिल्पी रतन, लॅमोर जाहिरातचे सीईओ प्रशांत गुर्जर, व्यवस्थापक आशिष भोयर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
माती व खडक तपासणी यंत्राद्वारे कामाचा शुभारंभ
मेट्रो रेल्वेसाठी पिलर उभारताना करण्यात येणाऱ्या खोदकामावेळी कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये म्हणून भूगर्भातील माती व खडकाचे परीक्षण आधुनिक यंत्राद्वारे करण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ मुख्य सचिवांच्या हस्ते शनिवारी मॉरिस कॉलेजजवळ करण्यात आला. या कार्यक्रमानंतर मेट्रो रेल्वेच्या कार्यालयात मुख्य सचिवांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला नागपूर मेट्रो रेल्वे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, विभागीय आयुक्त अनुप कुमार, नासुप्रचे सभापती श्याम वर्धने, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा व कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Send Land Proposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.