ई-मेल आय डी हॅक करून नागपुरात ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 03:05 PM2018-08-23T15:05:01+5:302018-08-23T15:05:23+5:30

निवृत्त अधिकाऱ्याचा ई-मेल आय डी हॅक करून त्यांच्या मित्राला मेल पाठवून सायबर गुन्हेगाराने एक लाख रुपयांचा गंडा घातला. शिरीष अवधूत कुलकर्णी (वय ६१) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

senior citizen cheated in Nagpur by email id hacking | ई-मेल आय डी हॅक करून नागपुरात ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

ई-मेल आय डी हॅक करून नागपुरात ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

Next
ठळक मुद्देधंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निवृत्त अधिकाऱ्याचा ई-मेल आय डी हॅक करून त्यांच्या मित्राला मेल पाठवून सायबर गुन्हेगाराने एक लाख रुपयांचा गंडा घातला. शिरीष अवधूत कुलकर्णी (वय ६१) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
कुलकर्णी धंतोलीतील लक्ष्मीनगरमध्ये राहतात. ते सीएसटीचे सेवानिवृत्त अधिकारी आहेत. ज्या विभागात ते काम करायचे, त्यावेळी तेथे कौशिक नामक अधिकारी होते. निवृत्तीनंतरही कुलकर्णी आणि कौशिकमध्ये मैत्री आहे. २१ आॅगस्टच्या सकाळी त्यांना कौशिक यांचा एक मेल मिळाला. भावाची प्रकृती खराब असून, उपचारासाठी एक लाख रुपयांची तातडीने गरज आहे. लवकरच ही रक्कम आपण परत करू, असा मेलमध्ये मजकूर होता. कौशिक चांगले मित्र असल्यामुळे कुलकर्णी यांनी त्या मेलवर नमूद असलेल्या एसबीआयच्या खात्यात एक लाख रुपये जमा केले. नंतर त्यांनी कौशिक यांच्याशी संपर्क केला असता त्यांना धक्का बसला. सायबर गुन्हेगाराने कौशिक यांचा मेल आयडी हॅक करून कुलकर्णी यांना ई मेल पाठवल्याचे स्पष्ट झाले. आरोपीने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर कुलकर्णी यांनी धंतोली पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पीएसआय राठोड यांनी फसवणूक तसेच माहिती व तंत्रज्ञानाचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

 

Web Title: senior citizen cheated in Nagpur by email id hacking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.