वर्गवाढीसाठी ५० हजारांची लाच घेताना वरिष्ठ लिपीक, शिक्षकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2023 09:58 PM2023-04-26T21:58:20+5:302023-04-26T21:58:46+5:30

Nagpur News शाळेतील वर्गवाढीसाठी लाच घेताना शिक्षण उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ लिपीक व एका शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांनाही कार्यालयातच रंगेहाथ अटक केली.

Senior clerk, teacher arrested for accepting bribe of Rs 50,000 for class promotion | वर्गवाढीसाठी ५० हजारांची लाच घेताना वरिष्ठ लिपीक, शिक्षकाला अटक

वर्गवाढीसाठी ५० हजारांची लाच घेताना वरिष्ठ लिपीक, शिक्षकाला अटक

googlenewsNext

नागपूर : शाळेतील वर्गवाढीसाठी लाच घेताना शिक्षण उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ लिपीक व एका शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांनाही कार्यालयातच रंगेहाथ अटक केली. लिपीक सुनिल महादेवराव ढोले (५२) व शिक्षक पवन ईश्वर झाडे (४४) अशी आरोपींची नावे आहेत. या कारवाईमुळे शिक्षण उपसंचालक कार्यालयात खळबळ उडाली असून तेथील कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.


चंद्रपूर येथील पोद्दार स्कूलच्या शाळेचे प्रतिनिधी असलेल्या एका व्यक्तीने शाळेतील वर्गवाढीसाठी प्रस्ताव पाठविला होता. वर्ग सहावी ते दहावीपर्यंत वर्गवाढ करण्याबाबतचा संबंधित प्रस्ताव होता व तो शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. या प्रस्तावावर शिफारस करण्यासाठी लिपीक ढोले याने तक्रारदाराला ५० हजार रुपयांची लाच मागितली. लाच देण्याचे ठरले व त्याच्या वतीने पवन झाडे हा पैसे घेईल, असे ठरले. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने एसीबीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. प्राथमिक चौकशी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला व आरोपीला ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्याची झाडाझडती घेण्यात आली असता त्याने वरिष्ठ लिपीकाचे नाव सांगितले. एसीबीच्या पथकाने दोघांविरोधातही गुन्हा नोंदविला आहे. उपअधीक्षक संदीप जगताप, पोलीस निरीक्षक उज्वला मडावी, पंकज घोडके, सचिन किन्हेकर, कांचन गुलबसे, शारीक शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Senior clerk, teacher arrested for accepting bribe of Rs 50,000 for class promotion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.