ज्येष्ठ इतिहासकार प्रा. मा. म. देशमुख यांचे निधन
By मंगेश व्यवहारे | Updated: March 19, 2025 14:59 IST2025-03-19T14:58:50+5:302025-03-19T14:59:26+5:30
Nagpur : जनता कला वाणिज्य महाविद्यालय मलकापूर येथे प्राध्यापक म्हणून काम केले

Senior historian Prof. Hon. M. Deshmukh passes away
नागपूर : ज्येष्ठ इतिहासकार प्रा. मा. म. देशमुख यांचे बुधवारी निधन झाले. ते ८९ वर्षाचे होते. दुपारी ४ वाजता त्यांच्या सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. प्रा. मा.म. देशमुख हे शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आले. शिक्षणाची त्यांना प्रचंड आवड होती. प्री-युनिव्हर्सिटी परीक्षेत ते मेरीट उत्तीर्ण झाले होते. इतिहास हा त्यांचा आवडीचा विषय होता. त्यांची चिकित्सक वृत्ती असल्याने ते इतिहासातील सत्यता बाहेर काढायचे. १९५४-१९६३ नागपूर पर्यंत नागपूर महापालिकेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी जनता कला वाणिज्य महाविद्यालय मलकापूर येथे प्राध्यापक म्हणून काम केले. १९६४ नंतर धनवटे नॅशनल कॉलेज नागपूर मध्ये इतिहास विषयाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. १ ऑगस्ट १९९६ ला सेवानिवृत्त झाले.
नवीन इतिहासाची मांडणी करणे, बहुजन जागृतीसाठी आपल्या लेखणीतून त्यांनी नवीन दालन उघडले. लेख भाषणे देऊन बहुजनांमध्ये जनजागरण केले. मध्ययुगिन भारताचा इतिहास या ग्रंथाचा माध्यमातून राजकीय, सामाजिक, संशोधन साहित्य क्षेत्रात त्यांनी प्रचंड नावलौकिक मिळविला होता. बहुजन समाज व चळवणीची मोठी हाणी झाली झाल्याने खंत व्यक्त होत आहे.
"प्रा. मा.म. देशमुख हे इतिहास संशोधन क्षेत्रातील तेजस्वी तारा होते. बहुजनांचे उद्धारक होते. चळवळीला समोर नेण्याचे काम त्यांनी लेखनीतून केले. ते कांशीरामजीच्या विचारांचे पाईक होते. त्यांच्या जाण्याचे बहुजन समाजाची व चळवळीची प्रचंड हाणी झाली आहे."
- डॉ. जयंत जांभूळकर, अध्यक्ष, फुले शाहू आंबेडकर टीचर्स असोसिएशन