ज्येष्ठ संघ विचारक रंगा हरी यांचे निधन

By योगेश पांडे | Published: October 29, 2023 02:38 PM2023-10-29T14:38:32+5:302023-10-29T14:38:58+5:30

१९९४ ते २००५ या कालावधीत ते आशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये हिंदू स्वयंसेवक संघाचे संपर्क कार्यकर्ते होते

Senior Sangh thinker Ranga Hari passed away | ज्येष्ठ संघ विचारक रंगा हरी यांचे निधन

ज्येष्ठ संघ विचारक रंगा हरी यांचे निधन

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ विचारक रंगा हरी (९३) यांचे निधन झाले. कोच्ची येथील इस्पितळात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
मागील अनेक दशकांपासून ते संघात कार्यरत होते. द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजींपासून अगदी वर्तमान सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्यासोबत त्यांनी कार्य केले होते. ते संघाचे अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख होते.

१९९४ ते २००५ या कालावधीत ते आशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये हिंदू स्वयंसेवक संघाचे संपर्क कार्यकर्ते होते. तर २००५ ते २००६ मध्ये ते अखिल भारतीय कार्यकारी मंडळाचे सदस्यही होते. संघाशी संबंधित पुस्तकांचे ते लेखकदेखील होते. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Web Title: Senior Sangh thinker Ranga Hari passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.